पाचोरा– येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयाचे उपशिक्षक प्रा. श्री शिवाजी शिंदे सर व जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर गोराडखेडा शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार यांना नुकताच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या निमित्ताने येथील
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल मध्ये दोनही गुणवंत शिक्षकांचा सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ प्रमिलाताई वाघ यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन दोन्ही शिक्षकांना सन्मानित केले. याप्रसंगी श्री. गो. से. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री एन. आर. (ठाकरे) पाटील सर, पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील व पर्यवेक्षक श्री. ए. बी. अहिरे सर उपस्थित होते.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Dhyeya News Channel WhatsApp Group: 1
Dhyeya News Channel WhatsApp Group: 2
Dhyeya News Channel WhatsApp Group: 3