Breaking

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसची आढावा बैठक संपन्न

0

पाचोरा -आगामी काळात पाचोरा – भडगाव बाजार समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दि. २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहरातील भडगाव रोडवरील महालपुरे मंगल कार्यालयात मा. आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती व स्थानिक

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सखोल चर्चा होवुन इच्छुकांनी उमेदवारीबाबत आप आपली मते व्यक्त केली. या बैठकीस रा. काॅं. पार्टीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, रा. काॅंग्रेसचे प्रवक्ते खलिल देशमुख, तालुका अध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, भडगाव तालुका

अध्यक्ष राहुल पाटील, प्रकाश पाटील, नितीन तावडे,डिंगबर पाटील यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
आगामी काळात होवु घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत सभासदांचा नोंदणी आढावा घेण्यात आला. याप्रसंगी आगामी निवडणुकांमध्ये

उमेदवारी करण्यास इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी यासाठी मत मांडले. तसेच जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, शालिग्राम मालकर, खलिलदादा देशमुख यांनी उपस्थितांना निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडुण येतील यासाठी कार्यकर्त्यांनी

जोमाने कामाला लागुन घवघवीत यश संपादित करण्यासाठी प्रयत्न करावे. पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असुन आगामी काळात होवु घातलेल्या कृषि उत्पन्न बाजार समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद दाखवावी. या बैठकीस मा. नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, शेतकी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, विनय जकातदार, पंचायत समितीचे मा. सदस्य डॉ. पी. एम. पाटील, प्रकाश भोसले, सुदाम वाघ, सुरेश देवरे, वाजीद बागवान, अभिलाषा रोकडे, जयसिंग परदेशी, रामधन परदेशी, भडगाव शहर अध्यक्ष हर्षल पाटील, युवक अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, आर. एस. पाटील, शामकांत भोसले, सुनिल पाटील, निकीता परदेशी, दत्ता बोरसे, अरुण पाटील, अमृता पाटील, अभिजीत पवार यांचेसह मोठ्या संख्येने पाचोरा व भडगाव

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचलन विकास पाटील, प्रास्ताविक नितीन तावडे तर उपस्थितांचे आभार रणजीत पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here