Breaking

सी.ए. प्रशांत अग्रवाल & मनोज सिसोदिया यांचा पत्रकार बांधवा तर्फे सत्कार

पाचोरा- येथील सी ए तथा पाचोरा पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रशांत अग्रवाल (Mo.- 98609 40777 ) यांची जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘इन कॉमर्स अँड बिझनेस लॉ ‘ या विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कुलगुरू डॉ माहेश्वरी यांनी

नियुक्ती केली आहे. तसेच मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटंट संस्थेची सर्वात मोठी प्रादेशिक परिषद असलेल्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या ‘आयसीएआय सहकारी संस्था समिती ‘ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल तसेच पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक पदी निवड झाल्या बद्दल मनोज सिसोदिया यांचा पाचोरा पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रशांत अग्रवाल यांची चार्टर्ड अकाउंटंट संस्थेची प्रादेशिक परिषद 1 लाख 16 हजार सीए व 2 लाख 25 हजार सदस्यांची पूर्तता करते. अशा नामवंत संस्थेवर नियुक्त होणारे प्रशांत अग्रवाल हे परिसरातील एकमेव सीए ठरले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here