Breaking

पाचोरा पिपल्स बँक “पुनच्छ फिर वही दिल लाया हुं” म्हणत आर्थिक प्रगतीच्या शिखराकडे एकाच दिवसात पाच कोटीची ठेव वाढली

0

नुकतीच संपन्न झालेल्या पाचोरा पीपल्स बँक निवडणुकीत सहकार पॅनल ने एकतर्फी विजय मिळवत नवीन संचालक मंडळ विराजमान झाले सत्तेचा काटेरी मुकूट विराजमान धारण केले तरी विद्यमान संचालक मंडळ विश्वास पात्र व यशस्वी कामगिरी करू शकणार नाही असं विरोधी लोकांकडून बोलले जात होते अर्थात कारणही तसेच होते कारण गेल्या काळात झालेल्या पीपल्स बँक भ्रष्ट्राचार तात्कालीन सत्तेतील आप्त जनांकडून स्नेही व पतपेढयाच्या ठेवी काढण्यासाठी उपकृत करणे पिपल्स बँकेची रोजी रोटी खाऊन हूकूमशाही वृत्तीवर प्रेम करणे यामुळे जनतेचा विश्वास समाप्त होत चालला होता परंतु यावेळी लोकांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत बँकेचे चेअरमन अतुल संघवी व विद्यमान संचालक मंडळाने ग्राहकांचा व ठेवीदारांचा विश्वास सार्थ ठरवत बँकेची वाटचाल यशस्वितेकडे नेत आहेत.
पाचोरा पीपल्स बँकेची यशस्वी वाटचाल बघत बुलढाणा अर्बन को ऑप सोसा. सारख्या मोठ्या आर्थीक संस्थेकडून पाचोरा पीपल्स बँकेला 5 कोटी रूपयांच्या ठेवी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्या बद्द्ल पाचोरा पीपल्स बँकेकडून बुलढाणा अर्बन सो सा. चे चेअरमन राधेश्यामजी चांडक यांचे आभार मानण्यात आले. यावेळी भाईजींचे व्याही & श्री शेठ एम एम महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य एस.झेड.तोतला ,बँकेचे व्हा चेअरमन प्रशांत अग्रवाल समवेत इतर संचालक मंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here