Breaking

छञपतिंचे नांव घेण्यास विरोध करुन अपमान करणाऱ्या वैंकय्या नायडूचा भडगांव “शिवसेना- युवासेनेच्या” वतिने तिव्र निषेध –(भडगाव- ध्येय न्युज ब्युरोचिफ सागर महाजन Mo. 9860259444 )

0

भडगाव-राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या समक्ष खासदार पदाची शपथ घेत असतांना आपल्या मातृभुमी चे तसेच आपले सर्वांचे दैवत असलेल्या छञपती शिवरायांचा आदरयुक्त उल्लेख केला.त्यावर आक्षेप घेत वैंकय्या नायडू यांनी उदयन राजेंना सांगितले कि हे माझे दालन आहे तुमचे घर नाहि ईथे अशा प्रकारे कुणाचा नामोल्लेख करायचा नाही.अशा प्रकारे महाराष्ट्रासह देशाचे दैवत असलेल्या छञपतिंचे आणि मातृभुमीचे नांव घेण्यास उघडपणे विरोध करुन अपमान करणाऱ्या वैंकय्या नायडूचा भडगांव “शिवसेना- युवासेनेच्या” वतिने तिव्र निषेध करण्यात येवून या कृत्याबाबत संबतीताने त्वरीत माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा आशयाचे पञ भडगांव तहसिलदारांकडे देऊन निषेध नोंदविला.या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी ,तालुका प्रमुख डाॕ. विलास पाटील,शहर प्रमुख योगेश गंजे,युवासेना ता.प्रमुख रविंद्र पाटील,शहरप्रमुख निलेश पाटील.पं.स.मा.सभापती पप्पू पाटील,जग्गूभोई,देवाजीअहिरे.सुरेश पाटील.आदि शिवसेना-युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here