Breaking

अन्न पदार्थ उत्पादक & विक्रेत्यांना अन्नसुरक्षेसाठी लायसन्स नोंदणी आवश्यक

0

  • भडगाव -केंद्र शासनाच्या अन्नभेसळ प्रशासन अंतर्गत फूड सेफ्टी व कोविड-19 ट्रेनिंग & सर्टिफिकेट या योजनेचा शुभारंभ
    स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच जळगाव येथे संपन्न झाला .खाद्यपदार्थ विकणार्‍या सर्व व्यापाऱ्यांना व उत्पादकांना अन्नसुरक्षेसाठी नोंदणी करणे शासन निर्णयानुसार गरजेचे
    असल्याने यासाठी केंद्र शासनाने दिनांक 25 एप्रिल २०१८ रोजी खाद्यपदार्थ विकणार्‍या सर्व व्यापाऱ्यांकरिता अन्न सुरक्षिततेसाठी व स्वच्छतेसाठी फुड ट्रेनिंग प्रोग्राम अंमलात आणलेला आहे. या योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे . सध्या संसर्गजन्य रोगांचा धुमाकूळ आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आढळलेला आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण सदर व्यापाऱ्यांना देऊन संसर्गजन्य रोगांना आळा व बचाव करण्याकरिता महत्त्वाचे आहे. या योजनेअंतर्गत छोटे व मोठे व्यापारी, किराणा दुकानदार, दुग्ध व्यवसाय, हॉटेल, पाणीपुरी,भेळ, पावभाजी अंडा व मास विक्री करणारे, फळ भाजी विक्रेते, बेक्री, रसवंती ,चहा दुकान, रेस्टॉरंट , घरगुती मेस, चिक्की, ड्रायफूट, सर्व अन्न प्रक्रियेत काम करणारे व्यवसाय इत्यादी व्यापारी, मोठे व्यवसायिक, शुगर मिल फाईल, राईस मिल, कोल्डस्टोरेज , चिक्की व गृह उद्योग, तसेच पापड लोणचे मसाले, चिप्स, शेव चिवडा, लहान मुलांचे खाद्य तयार करणारे, मिनरल वाटर प्लांट इत्यादी व्यवसायिकांची यादी जाहिर केलेली आहे. अशा सर्व खाद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना अन्नसुरक्षेसाठी प्रशिक्षण व नोंदणी करणे गरजेचे असेल. जे व्यवसायिक नोंदणी करण्यास टाळाटाळ करतील अशा व्यवसायिकांना त्यांचे इतर प्रमाणपत्रे नुतनीकरण होणार नाहीत. तसेच कार्यवाही होऊ शकते असेही शासन निर्णयामध्ये हे म्हटले आहे. केंद्र शासनाने सदर योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता( अन्नभेसळ अंतर्गत फोसटॅक-Fostac ) अधिकृत कार्यालयाची नेमणूक केली आहे. हे कार्यालय पत्ता शॉप नंबर 142 डी विंग ग्राउंड फ्लोअर नवीन बीजे मार्केट जळगाव व यांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नेमून यात शिबिर व सर्वे करीत आहेत. यांच्याकडे सदर व्यापाऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी. अशी माहिती ती या परिपत्रकाद्वारे फेसटॅक चे जळगाव कार्यालयचे संचालक श्री प्रमोद पोहेकर व मुख्य प्रबंधक श्री विनायक सोनार व श्री राकेश पवार,जळगाव यांनी कळविले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here