Breaking

हम बोलेगा तो बोलते की बोलता है पाचोरा पिपल्स कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार पणा उघडकीस माजी संचालकालाच मृत घोषीत करून चेक केला बाऊंन्स

0

पाचोरा- पिपल्स बँकेत नुकतीच एकतर्फी हुकूमशाही व भ्रष्ठ सत्ता उध्वस्त करून सभासदांनी मोठ्या आशेने विद्यामान संचालक मंडळास एकतर्फी सत्ता देऊन खुर्चीवर बसवले विद्यमान मंडळाने देखील काही दिवसातच आर्थिक बाबतीत विश्वासार्हता निर्माण करून मोठया प्रमाणावर ठेवी वाढवुन बँकेची अर्थीक स्थिती भक्कम केली
परंतु संचालक मंडळाचा स्वच्छ व पारदर्शक कारभार असला तरी बँकेतअजुनही माजी चेअरमन यांच्यावर निष्ठा कायम ठेवणारे काही बेजाबबदार कर्तव्यात कसुर करणारे कर्मचारी आजही कार्यरत आहे अशा या झारीतील शुक्राचार्याचा शोध घेऊन त्याचेवर नजर ठेवणे वेळे प्रसंगी काठोर कारवाई करणे गरजेचे झाले आहे कारण घडले असे की पाचोरा पिपल्स बँकेचे माजी संचालक व माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध मेडीकलचे मालक यांनी आपल्या पिपल्स बँक खात्याचा चेक संबधित कंपनीला दिला सदरचा चेक दिला त्या दिवसाच्या आधी पासुनच लाखो रुपयाची रक्कम त्या खात्यात असतांना जेव्हा सदरचा चेक बाऊन्स करण्यात आला यापेक्षाही धक्कादायक व आश्चर्याची बाब म्हणजे चेक बाऊंन्सचे कारण देतांना संबाधित खातेदार चक्क मयत झाल्याचे कारण लिहुन चेक परत पाठवण्यात आला असा हा पाचोरा पिपल्स मधील अधेर नगरी कारभाराचा शोध घेतला व चौकशी केली असता बँकेच्या मागील सॉफ्टवेअर मध्ये असलेला अर्थात जाणीव पुर्वक केलेला घोळ & त्रुट्या लक्षात घेता पारदर्शक व्यवहार होणेसाठी, राहण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर टाकण्याचे व मागील सॉफ्टवेअर मधील बँकेच्या व्यवहाराचे डाटा ट्रान्सफरचे काम सुरु आहे त्यामुळे गेल्या दोन महीन्या पासुन जुने- नवे अशा दोघं सॉफ्टवेअरवर काम करावे लागत असल्याने ही चुक झाल्याचे समजते परंतु विषय असा आहे यापुर्वी जर एखाद्या व्यापारी किंवा खातेदाराचा चेक बाऊन्स होत असेल तर त्यांना कॉल करून पुर्तता करणेसाठी कळवले जात असे & यासाठीच सह.बँकांना महत्व आहे परंतु चक्क माजी नगरसेवक, संचालक यांचा चेक बाऊंन्स होत आहे त्याला कारण काय? दिले जात आहे हे संबधित कर्मचारी,अधिकारी यांच्या लक्षात येऊ नये हे बँकेच्या दृष्टीने खेदाची गोष्ट आहे. कर्तव्यात कसुर करणारे, कुंभकर्णी झोपेत असलेले,जाणीव पुर्वक चुका करणारे झारीतील शुक्राचार्य फुटीर कर्मचारी, अधिकारी असतील तर विद्यमान संचालक मंडळाने कितीही पारदर्शक व स्वच्छ कारभाराचा ढोल वाजवला तर काहीही उपयोग नाही म्हणुन
“चुकीला माफी नाही” हे कठोर धोरण अवलंबणे गरजेचे आहे अन्यथा
“मन्ह्या मामान्या शंभर गाई….” या उक्ती प्रमाणे बॅकेची स्थीती होऊ नये एवढेच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here