Breaking

पुढे पोलीस गाडी,
मागे पोलीसगाडी,
मध्ये लाल दिव्याची गाडीत फिरतांना, भुतकाळ विसरला गुलाब गडी.

0

भडगाव- पाचोरा विधान सभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील हे कोरोनाग्रस्त असल्याने त्यांच्या गैरहजेरीत आज पाचोरा-भडगाव शहर- तालुका व तेथील नागरीक पोरके होऊन नये म्हणुन त्यांची कामे करण्यासाठी प्रतीनिधी(प्रतिआमदार) म्हणुन शिवसेनेच्या पदधिकाऱ्यांना महत्वपुर्ण जबाबदारी देण्यात आहे किंबहुना त्यां पदधिकाऱ्यांवर जो जबाबदारीचा भार टाकला आहे तो ते निष्ठेने पुर्ण करीत असल्याने आज अशी म्हणायची वेळ आली आहे की सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेने शिवाय पाचोरा-भडगाव शहर व तालुक्यात इतर पक्ष फक्त कागदोपत्रीच उरलेले दिसत आहे. अर्थात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी असे जबाबदारीने किशोर बारवकर व मनोहर चौधरी सारखे योध्दे & संघटन विधानसभा निवडणुकीच्या 2 वर्षे आधी जरी उभारले असते तर विधानसभा निवडणुकीत लागलेला पैसा,शारिरीक व मानसीक श्रम निम्यावर खर्च करावा लागला असता आणि जो अपेक्षीत विजयाचा लिड होता तो निश्चित मिळाला असता असो.
महत्वाचा विषय म्हणजे भडगाव शहर व तालुक्यात अवैध धंदे बंदीसाठी खुदः सद्स्थितीत प्रती आमदार म्हणुन महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडणारे माजी शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक मनोहर चौधरी सारख्या जबाबदार व्यक्तीने निवेदन व आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर सुद्धा स्थानीक पोलीस प्रशासनाने स्पेशली पि. आय. येरुळे साहेबांनी मनोहर भाऊंच्या निवेदनाची दखल न घेता अवैध धंदे बंद करण्याची मागणी करणारे मनोहर चौधरी यांच्या डेअरी समोरच त्यांच्या नाकावर टिच्च्युन बस स्थानक च्या बाजूला, पारोळा रोड, यशवंत नगर , बाजार चौक & ग्रामीण भागात तर पाटया लाऊन अवैध धंदे सुरु आहेत असे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असले तरी कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. सायंकाळी 7-00 वाजे नंतर कष्टकरी दुकानदारांना
पोलीसी भाषेत बंद करायला लावणाऱ्या पि. आय. येरुळे साहेबांच्या काळात गुटख्याचा दोन ट्रक माल भडगाव शहरात बाळद रोड परिसर, चाळीसगाव रोड व टोंनगाव येथे दोन ट्रकमध्ये विंमल यासह विविध प्रकारचे गुटखा काल रात्री उतरवण्यात आला आहे हे सर्व कोणाच्या आशिर्वाने वादाने
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. शिवसेना प्रमुखांच्या घरातील सदस्य असतांना शिवसेनेच्या पदधिकाऱ्यास अवैध धंदे बंद करण्याचा इशारा दयावा लागतो परीणाम त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही हे मला खंताने लिहावे लागत आहे एक वेळ होती कांग्रेसचे एकतर्फी राज्य असतांना शिवसेनेच्या कार्यकर्त्याना तडीपारीच्या नोटीसा लावणे असे एकतर्फी वातावरण सुरु असतांना देखील शिवसेनेने नुसता इशारा दिला किंवा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्व.गणेशजी राणा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत हे जरी पोलीस प्रशासनास कळाले तर तातडीने त्याकाळा पुरता का? असेना सर्व अवैध धंदे बंद असायचे
आज त्याच तडीपारीच्या आगीत होळपळून त्रास भोगलेले पालक मंत्री शिवसेनेचा खान्देशचा ढाण्या वाघ जेव्हा जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री झाल्याचे जाहीर झाले तेव्हा गर्व आणि अभिमान वाटला महाराष्ट्रात काहीही असो परंतु स्व. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना अपेक्षीत असलेला मंत्री जळगाव जिल्हयाला लाभलेला आहे ना.गुलाब भाऊंचेच भाषणात वाक्य असायचे “ज्या शिवसैनीकावर केस नाही तो शिवसैनीकच नाही” त्यापुढे वाक्य असायचे
“पुत्रव्हावा असा गुंडा,
त्याच्या हाती असावा मोठा दंडा,
त्याला असावा शिवसेनेचा भगवा झेंडा, आणि त्याने फोडावा अवैध धंदे व भ्रष्टाचाराचा हंडा.
पण हे मी सांगतो & लिहीतो कोणासाठी लाल दिव्याच्या गाडीत हरवलेल्या शिवसैनीका साठी मंत्री नंतर आधी मी शिवसैनीक आहे हे वाक्य भाषणात सांगुन टाळ्या प्राप्त करणाऱ्या पालकमंत्र्याच्या दिव्या खालीच अंधार आहे असे म्हणायची वेळ आली आहे संपुर्ण जळगाव जिल्हा सोडा खुःद् त्यांच्याच मतदार संघातील & पालक मंत्र्यांसाठी अनेक वेळा राजकीय बलीदान दिलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबभाऊ वाघ यांच्या अर्धांगिणीला गेल्या 15 दिवसापुर्वी महीलाचे शिष्ट मंडळ घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन अवैध दारू बंदीचे निवेदन द्यावे लागते मग ही तर भडगावची मागणी आहे व भडगाव कित्येक मैल दुर आहे असो
शेवटी असे म्हणावे लागेल
पुढे पोलीस गाडी,
मागे पोलीसगाडी,
मध्ये लाल दिव्याची गाडीत फिरतांना, भुतकाळ विसरला गुलाब गडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here