Breaking

नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा ऑनलाईन साजरा- (भडगाव- ध्येय न्युज उपसंपादक सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

0

भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल वडजी येथे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा झुम अॅप वर अॉनलाईन साजरा करण्यात आला.

कोरोना पार्श्वभूमिवर नानासाहेबांनी आवाहन केले होते की, कुणीही प्रत्यक्ष भेट न घेता उपलब्ध माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात .म.चेअरमन साहेबांच्या आवाहनानुसार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.पाटील,जेष्ठ शिक्षक बी.वाय.पाटील,वरिष्ठ शिक्षक एस.जे.पाटील,सप्ताह समिती प्रमुख जे.एच.पवार तसेच सर्व समिती प्रमुख़,सदस्य,शिक्षक,शिक्षिका,
शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी म.चेअरमन साहेबांना वाढदिवसाच्या अॉनलाईन शुभेच्छया दिल्या.विद्यालयात गरीब,गरजु,होतकरु,गुणवंत विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त क्षैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील,सचिव डॉ.पूनमताई प्रशांतराव पाटील,महाराष्ट्र राज्य मंत्रालय सचिव दादासो.प्रशांतराव विनायकराव पाटील यांनी शुभेच्छया स्विकारल्या व उपक्रमाबाबत धन्यवाद व कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here