Breaking

भडगाव तहसील कार्यालयात रेशनिग 100% ऑनलाइन, मग रेशन चा काळाबाजार कसा ?
पुरवठा निरीक्षकांचे दुर्लक्ष-(भडगाव- ध्येय न्युज उपसंपादक सागर महाजन & प्रतिनीधी माधव जगताप)

0

भडगाव – महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने रेशनिग व वाटप हे 100% झाल्याचे सांगितले जात असेल तरी रेशीनिग चा काळा बाजार अजून ही सर्रास सुरू असल्याचे दिसून येते तालुक्यातील काही रेशन दुकानदाराकडे 1400 रुपये किंटल गहू 1600 रुपये किंटल तांदूळ सहज विकत दिला जात आहे. परंतु ऑनलाइन जर झाले असेल यांच्या दुकानात रेशन उरते कसे असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो
या बाबत माहिती अशी की, तालुक्यातील काही दुकानदार हे ग्राहकांना उपलब्ध होणारे रेशन जर 25 किलो असेल तर त्यांचे थंब (अंगठा) घेऊन 15 किलो रेशन दिले जाते अश्या प्रकारे काही दुकानदार हे महिन्याला 8 ते 10 किंटल रेशन चा गफला करत असून आर्थिक दुर्बल घटकांना ना रेशना पासून वंचित ठेवत आहेत
ग्राहकांनी तक्रार केल्यास त्यांना त्याचे नाव कमी करण्यात येईल असे ही चर्चेत आहे अश्यावेळी जे मिळतंय ते आपल या भीतीने ग्राहक या संबंधी तक्रार करण्यास धास्तवत नाही
प्रशासनाने आर्थिक दुर्बल घटकांच्या हक्कच्या रेशन चोरी वर लक्ष घालुन त्यांची होणारी लूट थांबऊन यांची वेळवेळी दप्तर तपासले जाऊन यांचे गोडाऊन ही तपासले पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here