Breaking

पाचोरा शहरात दर सोमवारी “नो व्हेईकल डे ” “माझी वसुंधरा” अभियान, सायकल रॅलीद्वारे जनजागृती

0

पाचोरा-दिनांक 23/12/2020 रोजी पाचोरा नगरपरिषदे मार्फत पर्यावरण मंत्री मा.ना. श्री आदित्य ठाकरे जी तसेच पर्यावरण विभागाच्या प्रधाण सचिव मा. सौ. मनिषा म्हैसकर मॅडम यांच्या संकल्पनेतुन “माझी वसुंधरा” अभियानाअंतर्गत ‘नो व्हेईकल डे” पाळण्यात आला.

पाचोरा नगरपरिषद अंतर्गत निसर्गाशी संबधीत पृथ्वी,वायु,जल,अग्नि व आकाश या पंचतत्वावर अधारीत “माझी वसुंधरा”अभियानाचा शुभारंभ सायकल रॅलीद्वारे माननीय नगराध्यक्ष श्री संजय गोहील उपाध्यक्ष श्री शरद पाटे, माननीय मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 23/12 / 2020 सकाळी 11 वाजता नगरपरिषद कार्यालय पाचोरा येथुन करण्यात आला. रॅलीची सुरूवात नगरपरिषद कार्यालया पासुन झाली त्यानंतर स्वातंत्र्य सैनीक स्व.आण्णासाहेब दामोदर लोटल महाजन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक , जामनेर रोड,गांधी चौक, राधाकृष्ण मंदीर, देशमुखवाडी येथे सांगता करण्यात आली.

प्रत्येक सोमवारी “नो व्हेईकल डे “पाळण्याचे आवाहन नागरीकांना माननीय नगराध्यक्ष श्री संजय गोहील उपाध्यक्ष श्री शरद पाटे, माननीय मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी केले.2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या सहा महिन्यांचा कालावधीत “माझी वसुंधरा” अभियान स्थानिक संस्था मधुन राबविले जात आहे. जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच 5 जुन 2021 रोजी या अभियानाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या स्थानिक संस्थांना बक्षीस दिले जाणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी केले.

सदर रॅलीमध्ये पाचोरा नगरपरिषदेचे माननीय अध्यक्ष श्री संजय गोहील, उपाध्यक्ष श्री शरद पाटे, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, आरोग्य निरीक्षक श्री धनराज पाटील, कर अधिक्षक दगडू मराठे ,नगर रचना अभियंता श्रीमती मानसी भदाने, शहर समन्वयक प्रिया तायडे, फायरमन राजू कंडारे,मुकादम देविदास देहडे,राजु लहासे,राकेश फतरोड,वाल्मीक गायकवाड,निलकंठ ब्राम्हणे, विनोद सोनवणे, बापु ब्राम्हणे,आमोल अहिरे, अशोक सोनवणे, डिगंबर पाटील, व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here