Breaking

डॉ.अस्मिताताई यांचा भा.ज.प.ला जय श्रीराम
राष्ट्रवादी-भाजप नंतर आता शिवसेनेत जाण्याची शक्यता?

0

पाचोर- भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या प्रदेश सदस्य प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांचा भाजपाचा राजीनामा दिला आहे.भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपण प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीच प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला जयश्रीराम करत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची साथ करत त्यांच्या नेतृवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता डॉ.अस्मिता पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे.त्या पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वगृही जातील असे वाटत नाही त्यामुळे त्या गुलाबभाऊंचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेची कास धरतात का? हे पाहणे औत्युक्याचे ठरणार असले तरी ध्येय न्युजच्या राजकीय अंदाजा नुसार पुढची लोकसभा आमदार किशोरआप्पा लढवुन स्व.तात्यासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याने त्यांच्या आमदार पदाच्या रिक्त जागी शिवसेनेकडून लढण्यासाठी
डॉ.अस्मिता पाटील या शिवसेनेतच जातील असे वाटत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here