Breaking

महाराष्ट्रात बर्ड फ्लू चा शिरकाव परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यु

0

राज्यातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावी 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली.
त्यामुळे मांसाहारी लोकांसाठी ही एक चिंताजनक बातमी आहे. देशातील 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव आढळून आल्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झालं आहे
3 दिवसांपूर्वी मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच (Bird flu) झाल्याचं आता निष्पन्न झाले. जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल नुकतेच प्राप्त झाल्या नंतर मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने स्पष्ट आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, येथील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here