Breaking

पिकेल ते विकेल अभियानातंर्गत धरणगावात भाजीपाला विक्री केंद्राची सुरुवात
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

0

चोपडा – कृषी विभागाच्या धरणगाव तालुका कृषी कार्यालयामार्फत पिकेल ते विकेल योजनेतंर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री या संकल्पनेवर आधारित शेतमाल व भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज चौक, धरणगांव व एरंडोल रोड, अमोल रेसिडेंसी जवळ याठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


या प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार नितीनकुमार देवरे, आत्मा चे प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधवर, गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नावरे, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, नगरसेवक राजेंद्र महाजन, विलास महाजन, भागवत चौधरी, आत्मा बिटीएम दिपक नागपुरे, कृषि पर्यवेक्षक किरण देसले, कृषि पर्यवेक्षक अरुण कोळी, कृषि सहाय्यक राजेंद्र लोहार, किरण वायसे, गजानन मोरे, चंद्रकांत जाधव, रमेश महाजन आदि उपस्थित होते.
याप्रसंगी भोल्हाई माता शेतकरी गट, राजर्षी शाहू महाराज कृषि विज्ञान मंडळ, भटाईमाता शेतकरी गट, बिलखेडा, साई गजानन शेतकरी उत्पादक कंपनी, धरणगांव यांच्यामार्फेत सेंद्रिय भाजीपाला विक्री करण्यात आला. या शेतमालाला ग्राहकांनी पसंती दिली तसेच या कार्यक्रमात शेवगा, कांदा, टोमॅटो, कारले, दुधीभोपळा, दोडके, शेपू पालक, मधुमका, गाजर, कागदी लींबु, वांगे खरेदीस ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here