Breaking

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, तहसीलदार सागर ढवळे यांनी केली मध्यरात्री कारवाई

0

भडगाव-गिरणा नदीचे वस्त्रहरण केव्हा थांबणार या मथळ्याखाली दोन दिवसापूर्वी ध्येय न्यूजने रोक ठोक बातमी प्रसिद्ध करताच नवनियुक्त तहसीलदार सागर ढवळे यांनी काल रात्री दीड वाजेच्या सुमारास गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले असून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

या कारवाई तहसीलदार श्री. सागर ढवळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला व सर्वांसाठी त्रासदायक ठरणारी गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्यामुळे तहसीलदार श्री सागर ढवळे यांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक असे की गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उचलून की ट्रॅक्टरद्वारे नेत असताना रस्त्यावर तहसीलदार यांच्या पथकाने पकडले व दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे याबाबत दंडात्मक कारवाई होणार असल्याचे नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी सांगितले या पथकात तहसीलदार श्री सागर ढवळे तलाठी रत्नदीप माने मंडळाधिकारी आरपी शेजवळकर आदींचा पथकात समावेश होता.
जुना पिंपळगाव रस्ता अवैध वाळूचे माहेरघर-
भडगाव शहरात सर्वात जास्त अवैध वाळू उपसा होत असेल तर जुना पिंपळगाव रस्त्यावरील घोड्याच्या बाबा जवळ गिरणा पात्रातून दररोज जेसीबीने दहा डंपर अवैध वाळू उचलली जाते. व ती वाळू गॅस गोडाऊन च्या बाजूला थप्पा मारली जाते. व तेथून बाहेरगावी रवाना केली जाते. या ठिकाणी सुद्धा तहसीलदार यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here