Breaking

मुख्याधिकारी यांच्याकडे चेतन पाटील यांची तक्रार व हरकतभडगाव नगरपालिका वार्ड क्र.5 मध्ये 350 बोगस मतदारांचे नावे

0

भडगाव- प्रतिनिधी

भडगाव नगरपालिका वार्ड क्रमांक ५ मधील बेकायदेशीररित्या अनाधिकृतपणे वार्डातील अथवा शहरातील रहिवासी नसलेले बोगस मतदारांविषयी कडक कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन व हरकती मुख्याधिकारी यांना चेतन रंगनाथ पाटील यांनी दिले
या निवेदन व हरकती अर्जात म्हटले आहे की,मी स्वतः वार्ड नं.५ मधील कायमचा रहिवासी असून सदरील वार्डातील सुज्ञ मतदार देखील आहे. सदर कामी भडगाव नगरपरिषदेची निवडणुकीबाबत शहरात वारे चालू असून सदर नगरपरिषद भडगाव यांनी दि.१५/०२/२०२१ रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्या बाबत काही हरकती
दि.२२/०२/२०२१ ही अंतिम तारीख होती.
भडगाव नगरपालिका वार्ड नं.५ मधील लोकांना घर ते घर परिचित आहे परंतु सध्याची नगरपरिषद भडगाव यांनी प्रसिद्ध केलेली मतदार यादीची सही शिक्क्याची नक्कल मी दि.१५/०२/२०२१ रोजी घेतली असून तिचे अवलोकन केले असता मला अनेक नावे अपरिचित असे आढळून आलेली असून तशा नावाची व तशा आडनावांची व्यक्ती सदरील वार्डातच काय? संपूर्ण भडगाव शहरात आढळून येणार नाहीत.
सदरील इसमांना कोणीतरी राजकीय खोटी प्रतिष्ठा टिकवण्या कामी बाहेरगावच्या सदरील इसमाचा सदरील वार्डात समावेश करून बेकायदेशीररित्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्या सदरील मतदार यादीत समावेश केल्याचे प्रथमदर्शनीच निदर्शनास येते.सदरील वार्ड नं.५ मध्ये मतदार बाहेर गावातील रहिवासी असल्याचे दिसून येते.
वर नमूद इसमांचे नावावर सदरील वार्डात कोणत्याही प्रकारच्या घर मिळकती अथवा इतर मिळकती नाहीत. इतकेच नव्हे तर सदरील हरकतीतिल इसमांचे नावे भडगाव शहरात अन्य कोठे देखील मिळकती नाहीत. सदरील यादीत नमूद काही आडनावांच्या व्यक्ती या भडगाव तालुक्यात सुद्धा नाहीत. यावरून सदरील इसमांना राजकीय हौसेपोटी निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धूळफेक करून गावातील काही संबंधित इसमांना हाताशी धरून तसेच तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सदरचे बेकायदेशीर कृत्य केलेले आहे.
इतकेच सदरील वार्ड नं.५ मध्ये गावातील व शहरातील अन्य वार्डातील रहिवासी लोकांना देखील सदरील वार्डात त्यांचे घर अथवा त्यांचे काहीही नसताना केवळ निवडणुकीत गठ्ठा मतदान मिळावे म्हणून त्यांनादेखील सदरील वार्डाचे मतदार यादीत समावेश केल्याचे सदरील प्रसिद्ध केलेली मतदार यादी पाहता दिसून येते. अशा प्रकारे सदरील वार्ड नं.५ मध्ये अंदाजे ३०० ते ३५० मतदारांचे सदरील वार्डात काहीही संबंध नसताना नाव असल्याचे दिसून येते. त्याबाबत यापूर्वी देखील काही लोकांनी हरकती उपस्थित केल्याचे समजते. परंतु सदर बाबत वरिष्ठ पातळीवरील राजकीय स्तरातील दबावामुळे अद्यापपावेतो काही एक कारवाई झाली नसल्याचे समजते. सदर बाबत सदरील वादळाचा एक सुज्ञ नागरिक व मतदार म्हणून सदरील बाबीचा आपल्याकडे उलगडा व्हावा, व सदर वार्ड वासियांना न्याय मिळवून त्यांना हक्काचा व न्यायाचा प्रतिनिधी मिळावा या कामी वरील प्रकारे बेकायदेशीररित्या झालेला मतदार यादीतील गैरप्रकार आपले निदर्शनास येवून त्याबाबत तात्काळ तातडीने कारवाई होऊन सदरील मतदार यादीचे सर्वेक्षण करून योग्य ती मतदार यादी प्रसिद्ध करणे गरजेचे व आवश्यक झाले आहे. जेणेकरून सदरील बेकायदेशीर अनोळखी अशा तसेच सदरील वार्डाशी कोणताही संबंध नसलेल्या३०० ते ३५० इसमांचा गठ्ठा मतदानाचे जोरावर गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सबब, सदरील आपण प्रसिद्ध केलेल्या वार्ड नं. ५ च्या मतदार यादीस हरकत वजा तक्रारी अर्ज देणे भाग झाले आहे.सदरील हरकत वजा तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेऊन त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येऊन, सदरील मतदार यादी ची अंतीम दुरुस्ती प्रत प्रसिद्ध करण्यात यावी तसेच
सदरील वार्ड नं.५ मधील वरील प्रकारचा मतदार यादीतील घोळ मिटवून, सदरील यादीप्रमाणे वार्डाचे कायदेशीररीत्या सर्वेक्षण करून योग्य ती मतदार यादी प्रसिद्ध करून वार्ड नं.५ ला न्याय मिळावा.सदरील वार्ड क्र.५ मधील रहिवासी नसलेल्या व भडगाव शहरातील देखील रहिवासी नसलेल्या परंतु स्वार्थासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट केलेल्या, करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी व हरकत चेतन रंगनाथ पाटील यांनी घेतली असून निवेदनाच्या प्रती, आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, प्रांत अधिकारी, पाचोरा, तहसिलदार भडगाव यांना पाठविण्यात आल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here