Breaking

केशवसुतांच्या पवित्र भूमीत आम्ही जन्मलो असल्यामुळे कविता आमच्या रक्तात- कवी विठ्ठल चौधरी शिवणीकर

0

भडगाव-ग्रामीण जीवनाशी व काळ्या मातीशी माझी नाळ जुळलेली असल्यामुळे शेतकरी ,कष्टकरी ,स्त्रीयांचे दुःख माझ्या कवितेतून व्यक्त होतात ,केशवसुतांच्या पवित्र भूमीत आम्ही जन्मलो असल्यामुळे कविता आमच्या रक्तात आहे त्यामुळे सरस्वतीची सेवा करीत आहे असे भावनिक उदगार कवी विठ्ठल चौधरी ,शिवणीकर यांनी त्यांच्या कविता संग्रहाच्या प्रदर्शन प्रसंगी व्यक्त केले .सिनियर सिटीझन जेष्ठ नागरिक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भडगाव पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री.अशोकराव उत्तेकर यांच्या शुभहस्ते श्री चौधरी यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले .याप्रसंगी तहसीलदार सागर ढवळे ,अध्यक्ष अनिल पवार ,उपाध्यक्ष साहेबराव महाजन ,सचिव पवार व मोठया संख्येने जेष्ठ नागरिक बंधू -भगिनी उपस्थित होते .

चौधरी यांनी लॉक डाउन च्या कालावधीत मी शेतकरी ,आई बाबा ,स्त्री अनमोल रत्न ,विठ्ठल माऊली ,शेतकरी पाऊस श्रावण ,विशाल अंबर ,अमृत रस ,सुखाचे बेट ,खजिना मनातला ,डाळींबाचे दाणे असे एकूण 10कविता संग्रह प्रकाशित करण्यात आले .या कविता संग्रहातूनआत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनचे दुःख ,स्त्रीया विषयी समाजाचा दृष्टीकोन ,निसर्गाची महती ,आई वडिलांविषयी चा ममत्व भाव व्यक्त होतो .जेष्ठ नागरिक संघा तर्फे कवी चौधरी यांचा सत्कार करण्यात आला .शिवणीचे माजी सरपंच स्वरूप पाटील यांनी पहिला ग्रंध संच खरेदी केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here