Breaking

पा.ता.सह.शिक्षणसंस्था संचलित
गो. से. हायस्कूलला संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी
राष्ट्रीय खेळणी जत्रेत विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

0

पाचोरा- संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.यांच्या ६४४ व्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय खेळणी जत्रेत विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग
विविध खेळ खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणे या हेतूने आर्ट्अँस्थेटीक्स विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा २७ फेब्रुवारी ते २ मार्च यादरम्यान होत असून राष्ट्रीय स्तरावरील आभासी पद्धतीने होणाऱ्या या जत्रेत श्री. गो. से. हायस्कूलच्या बारा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक खेळणी व आनंददायी खेळणी तयार करून सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी बॉल बाउन्सर, टाय ट्राफिक पोलीस, शूटर गन, दिव्यांग मुलांसाठी ब्लाइंड अल्फाबेट अशा प्रकारची विविध खेळणी तयार केली. खेळणी तयार करतानाचे लाईव्ह व्हिडिओ,खेळणी बनवण्याची पद्धत,लागलेले साहित्य यांची माहिती ऑनलाइन देण्यात आली असून या जत्रेत श्रुती शिंपी, भूमी पाटील,आकांशा कुव्हरे,वृंदा येवले, चेतना खैरनार ,सृष्टी आखाडे, दिपाली सोनवणे, मिहीर शिंपी ,मोहित मिस्त्री , सुमित पाटील ,धीरज पवार ,ऋषिकेश न्याती, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून कला शिक्षक एस डी भिवसने, सुबोध कांतायन यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मा.सचिव अड. महेश देशमुख,व्हॉ. चेअरमन व्ही. टी. जोशी,शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन,शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका पी.एम वाघ यांनी कौतुक केले असून यावेळी पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर. ठाकरे, ए .बी. अहिरे,टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिंनकर व शिवाजी शिंदे,मंगेश पाटील,महेश कौडिण्य,रणजीत पाटील,कला शिक्षिक प्रमोद पाटील, ज्योती पाटील,आर.बी.कोळी,धनराज सोनवणे,बबन पाटील,नाना साळवे, संजय पाटील, विजय महाजन यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतकर बंधू भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here