Breaking

कष्ट ,जिद्द ,कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीत देखील यशस्वी होऊ शकतो-प्रा.नेहा मालपुरे

0

भडगाव- माणसात कष्ट ,जिद्द ,कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीत देखील यशस्वी होऊ शकतो असे विचार जागृती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा . नेहा मालपुरे यांनी व्यक्त केले .कर्णबधिर व अंध मुलीवर आधारित प्रेरणा व मनश्री या दोन पुस्तकावर त्यांनी आपले विचार मांडले.जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगले मार्गदर्शक देखील मिळाले पाहिजे ,कारण गुरु च्या दुर्ष्टीतून शिष्याच्या व्यक्तिमत्व तील चांगले गुण पारखले जातात व आई ही पहिली गुरु असते ,म्हणून कर्णबधिर असून प्रेरणा मधील गुण आईने हेरले व तिला प्रोत्साहन दिले त्यामुळे ती जीवनात यशस्वी होऊ शकली. याप्रसंगी कवी विठ्ठल चौधरी यांचे 10 कविता संग्रह प्रकाशित झाल्याबद्दल वाचनालयातर्फे संचालक नारायण कोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .याप्रसंगी लाडकूबाई विध्यमंदिराच्या मुख्याध्यापिका मेघा शिंदे ,सौं अनिता भंडारी ,डॉ .सौं .रुले ,सौं कालिंदी सहश्रबुद्धे ,सौं .प्रतिभा कुळकर्णी ,कु .प्रतीक्षा तातार ,कु .पूजा चिमणपुरे इत्यादी भगिनी उपस्थित होत्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here