Breaking

प्राचार्य डॉ बी एन पाटील सेवानिवृत्त

0

पाचोरा-येथील पीटीसी शिक्षण संस्था संचलित एम एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एन पाटील हे ता 28 फेब्रुवारी रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. प्राचार्य डॉ पाटील यांनी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या तसेच सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाशी संबंधित समित्यांवर उल्लेखनीय कार्य केले .

खानदेशच्या इतिहासावर आधारित पुस्तकेही लिहिली. दहावी व बारावी बोर्डाच्या समित्यां वरही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. सेवानिवृत्ती निमित्ताने सहकारी प्राध्यापकांच्या वतीने तसेच संस्थेच्या वतीने व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी यांच्या हस्ते त्यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ जयंतराव पाटील ,दुष्यंत रावल ,नाना देवरे ,संजय कुमावत, प्रा डॉ वासुदेव वले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here