Breaking

तहसील कार्यालायात महिला बीएलओं चा सत्कार

0

पाचोरा – येथील तहसील कार्यालयाच्या वतीने शहर व तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बीएलओंचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्ताने तहसीलदार कैलास चावडे यांच्या दालनात सत्काराचा कार्यक्रम झाला.

मतदार व मतदान जनजागृती, अद्ययावत मतदान कार्ड, मतदार नोंदणी व मतदार याद्या या संदर्भात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरिता पाटील (चिंचखेडा’ व पुष्पा गोसावी यांचा तहसीलदार कैलास चावडे, नायब तहसीलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहसील कार्यालयाचे कर्मचारी व महिला बीएलऊँचे नातलग उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here