Breaking

पाचोरा पोलीस ठाण्यात महिलांचा गुणगौरव

0


पाचोरा-येथील पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्ताने पोलीस अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा गुणगौरव करण्यात आला.

पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील अध्यक्षस्थानी होते. पोलीस ठाण्याच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक नजनपाटील यांच्या हस्ते उपनिरीक्षक विजया वसावे, महिला पोलीस शारदा भावसार, ज्योती बोरसे, वैशाली मराठे, महिला पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्य व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यशस्वी ठरलेल्या महिलांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. राहुल मोरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here