Breaking

नांद्रा येथे घर कोसळुन एक महिला व एक बालकाचा दुर्दैवी मृत्यू

0

नांद्रा – येथे दि.4 रोजी राञी 11.वा. कै.नामदेव धना पाटिल यांच्या कुटूबांवर काल काळाने अनपेक्षित घाला घालून ते राहत असलेल्या नवेगावातील भाडेच्या मातीच्या घरात पावसाच्या सततधार रिपरिप मुळे पाणी मुरून घराचे छत व घर कोसळल्याने त्याच्या खाली दबून त्यांच्या पत्नी शोभाबाई नामदेव पाटिल वय ५० वर्षे व त्यांचा नुकतीच डिलेवरी झालेल्या मुलीचा अवघ्या सव्वा वर्षाचा मुलगा समर्थ संदिप पाटील (रा.लोण)यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व बाकीचे कुटुंबातील तिन सदस्य एक मुलगा व दोन मुली यांना गावातील तरुणांच्या व ग्रामस्थांच्या सर्तरकतेमुळे कुटूबांतील उर्वरीत सदस्याना वाचवण्यात यश आले ते किरकोळ जखमी झाले आहेत परंतु अकल्पित आलेल्या या संकटामुळे मातृपितृ छत हरवलेल्या या मुलांना पुढिल आयुष्य कसे जाईल याविषयी हळहळ व्यक्त आहे. कुटूंबातील कर्ता पुरूष नामदेव पाटील गेल्यानंतर त्यांच्या पत्नी घरातील आधारवड म्हणून शोभाबाई नामदेव पाटिल प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत आपल्या कुटूबांचा गाढा ओढत असताना त्यांचा कुटूबाःवर हा अनपेक्षित कोसळलेल्या दुःखाचा डोंगर मुळे आता दृष्टीने अधु असलेला १३ वर्षाचा एक मुलगा,एक १० वर्षाची मुलगी माञ त्यांचे मातृपितृ छत हरपल्याने रस्त्यावर आले आहेत तरी शासन स्तरावरुन झालेल्या जान माल ची पंचनामा करुन योग्य भरपाई या कुटूबांला मिळावी व समाजातील ही दानशुर व्यक्तीनी या मुलांच्या शिक्षणाच्या व संगोपन खर्चासाठी पुढे यावे अशी चर्चा सुज्ञ व संवेदनाशील लोकांना मधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here