Breaking

हम बोलेगा तो,
बोलते की!
बोलता है. हे नाही केले तर लॉक डाऊन लागणारच

0

पाचोरा- आज कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे अर्थात याला कारणीभुत तुम्ही- आम्ही-आपणच लॉक डाऊन समाप्त होताच जणु काही कोरोना पण समाप्त झाला अशा पद्धतीचे सर्वत्र दिसुन आले नेमकी हीच संधी कोरोनाने साधली आणि पुनश्च डोकेवर काढले अर्थात मागील पेक्षा यावेळी संसर्ग स्पीडने वाढत असला तरी आता लॉक डाऊन व्हावे यासाठी कोणत्याच घटकाची मानसीक तयारी नाही किंबहुना लॉक डाऊन व्हायलाच नको


व कोरोना पसरू नये यासाठी जे जबाबदार घटक व प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी फक्त कागदोपत्री कर्तव्य न बजवता आणि तोंड पाहून कारवाई न करता जात-पात-धर्म- पक्ष- संघटना- सत्ताधारी-विरोधी असे काहीच न बघता किंवा विशिष्ठ घटकाला जबाबदार न धरता नियम- अटीचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात थेट गुन्हा दाखल, कारवाई,दंड, सील करणे ( लग्न असेल तर नवरदेव-नवरीसह सर्वावर गुन्हा दाखल & अटक,व्यवसायीक असेल तर गुन्हा दाखल+ सिल किंवा हातगाडी वाले असतील तर माल जप्त, वाहन नियम-अटीचे उल्लंघन होत असेल तर कोरोना समाप्त होई पावेतो वाहन जप्त) इ. होणे गरजेचे आहे कोणी हिटरशाही जरी म्हटले तरी चुकीला माफी नाही अशा प्रकारचा एकसुत्री कार्यक्रम युद्ध पातळीवर राबवला तरच कोरोना प्रसरणाला थांबवु शकु अन्यथा लॉक डाऊन पर्यायाने “करे कोई, भरे कोई” या उक्ती प्रमाणे सर्वाना सामोरे जाण्याची मानसीकता ठेवावीच लागेल असे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here