Breaking

विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत भडगाव येथे भाजीपाला विक्री केंद्र उद्घाटन

0

भडगाव तालुका बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल व कष्टकरी शेतकरी यांना शेतमालास चांगला भाव मिळेल अशी संकल्पना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार भडगाव श्री सागर ढवळे यांच्या हस्ते शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री केंद्राचे सुरुवात करण्यात आली माननीय तहसीलदार भडगाव यांनी तहसील आवारात स्टॉल साठी जागा उपलब्ध करून दिली व भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांच्या वतीने एक छत्री स्टॅन्ड निंबोळी अर्क पाच लिटर महा एन पी के ट्रायकोडर्मा उपलब्ध करून देण्यात आले. उद्घाटन प्रसंगी तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोरडे मंडळ कृषी अधिकारी सचिन खेडेकर कुमारी ज्योती कडू मॅडम व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण वाघ यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here