Breaking

मेडीकल चालकाने कोरोना रुग्णाचे मेडीकल बिल चक्क निम्या पेक्षाही घेतले कमी

0

पाचोरा – सध्या कोरोनाची भीषण लाट हि प्रामुख्याने महाराष्ट्रात जाणवत आहे. त्यातल्या त्यात कोरोन ग्रस्तांच्या लाटेमध्ये पहिल्या ५ क्रमांक मध्ये जळगांव जिल्ह्याने आपले स्थान पटकावले आहे पहिल्या लाटेत जेवढे कोरोना रुग्ण वाढीचे व मृत्युचे प्रमाण नव्हते त्यापेक्षा जास्त सध्याच्या काळात दिसत आहे. अर्थात याला कारणीभूत तुम्ही – आम्ही आपण सर्वजणच आहोत हे कटू सत्य प्रत्येकाला मान्य करावे लागेल. शासनाने सर्व स्तरावरून वेगवेगळे प्रयत्न केले परंतु या संकटावर विजय प्राप्त करू शकलो नाही याच परिपाक आज आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत आहे अर्थात कोरोना आजाराला काही लोक मान्य करायला तयार नाहीत तर काही लोक कोरोन संसर्गाने रुग्णालयात उपचार घेत आहेत अशा स्थितीत शासनाने परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय रुग्णालयात व कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करून उपचार करीत आहेत. मात्र बराचश्या वेळेस औषधी पुरवठा समाप्त होत आहे तर येण्यासाठी वेळ लागत आहे त्यामुळे गरज लक्षात घेता रुग्णांच्या नातेवाईकांना थेट खाजगी मेडिकल गाठावे लागत आहे याची प्रचीती आज स्वतः ध्येय न्यूजचे संपादक व ध्येय करिअर अॅकॅडमिचे संचालक संदीप महाजनसर व ध्येय न्यूजचे कॅमेरामॅन कृष्णापुरी येथील रहिवाशी मयुर महाजन यांना आली घडले असे की 3 दिवसाचा लॉकडाऊनचा आज दि. १९ मार्च शुक्रवारचा पहिला दिवस असल्यामुळे शासकीय यंत्रणा सकाळी व सायंकाळी संपूर्णपणे कृतीशील असते मात्र दुपार सत्रामध्ये वस्तुस्थिती चे वृत्त संचालन करण्यासाठी संदीप महाजन व मयुर महाजन दुपारी ०३.३० pm च्या सुमारास बाहेर पडले असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एका अनोळखी व्यक्ती ने हात देऊन थांबवले आणि गयावया करत आपली आपबिती कथन केली माझी आई पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोरोन आजारावर उपचार घेत आहे आणि मी श्री मेडिकल पाचोरा येथे औषधी घेण्यासाठी गेलो असता त्याठिकाणी संबंधित मेडिकल मालकाने एकूण बिल १६५०० सांगितले आणि माझ्याजवळ फक्त ८००० रु. आहेत. पत्रकार साहेब मला काहीही करा आणि मदत करा ! संबंधित व्यक्तीशी चर्चा केली असता त्याने स्पष्ट सांगितले माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत आणी मी कधी देईत हे सुद्धा सांगु शकत नाही कारण माझ्याजवळ सुर्यफुल विकून जे पैसे आले होते ते सर्व समाप्त झाले आहे शिवाय माझी परिस्थिती गरिबीची असे सांगत तो गयावया करून विनंती करू लागला शेतकरी आणि गरिबी या नावाचा उपयोग करत आजही अनेक बिन गरजू देखील फायदा घेत आहे ही बाब सर्वश्रुत आहे परंतु संबधित व्यक्तीच्या बोलण्यातून खरच असे जाणवले माझ्याजवळ फक्त एवढे पैसे आहे आणि पुढे कधी देईल हे हि सांगू शकत नाही त्यामुळे संबंधीत व्यक्तीच्या बोलण्याची व परिस्थितीची पडताळणी करण्यासाठी त्या गावातील एका whatsapp ग्रुप ला ध्येय न्यूजचा क्रमांक अॅड असल्यामुळे त्या ग्रुपच्या अॅडमिनशी थेट संपर्क साधला आणि संबंधित व्यक्तीची परीस्थिती जाणून घेतली प्राप्त माहिती नुसार सदरचा व्यक्ती खरोकर गरीब होता आणि त्याची आई पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होती त्यामुळे सदरच्या व्यक्तीला सोबत घेतले आणि थेट विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील राजेंद्र दयाराम भोसले (आमडदेकर) यांच्या मालकीचे श्री मेडिकल गाठले त्यावेळी त्यांचा मुलगा हर्षल राजेंद्र भोसले हे उपस्थित असल्यामुळे मनामध्ये शंकेची पाल चूक-चुकली कारण राजेंद्र भोसले ऐवजी त्यांचा मुलगा काऊंटरवर असल्यामुळे हा आपल्या शब्दाला कितपत मान ठेवतो हा प्रश्न होता तरीसुद्धा थेट हर्षल यास विनंती केली कि सदरच्या व्यक्तीची परिस्थिती फार गरिबीची आहे व सदरची सत्यता मी पडताळून बघितली त्यांच्याजवळ औषधीचे १६५००रु. देण्याची परिस्थिती नाही तू वडीलांना म्हणजेच राजूभाऊ यांना फोन लाव आणि किती पैसे कमी करू शकतात हे विचारून घे त्यावेळी हर्षल भोसले यांनी नम्रपणे उत्तर दिले सर मी तुम्हाला चांगला ओळखतो आज माझा भाऊ अभय हा आपल्या ध्येय करिअर अॅकॅडमित होता आज तो आपल्या आशीर्वादाने सलगपणे M.B.B.S पास होऊन एम .डी . चे शिक्षण घेत आहे आणि मी तुमच्या ध्येय न्यूज चॅनलच्या बातम्या नियमित बघतो आणि वाचतो आपला निर्भीड व स्पष्ट वक्तेपणाचे शब्द बरेच काही सांगून जातात त्यामुळे मला कोणालाही विचारायची गरज नाही संबंधित व्यक्तीजवळ त्याच्या आईचे मेडिसिन घेण्यासाठी किती पैसे आहेत तेवढे द्या त्यावेळी संबंधित व्यक्तीने आपल्याजवळचे ८००० रु. श्री मेडिकलच्या काऊटरवर ठेवले त्यावेळी मला धक्काच बसला एकूण बिल १६५०० रु. होते आणि संबंधित व्यक्तीने फक्त ८०००रु दिल्याने बिलाची फार मोठी फरकाची रक्कम होती तेव्हा श्री मेडिकल चे संचालक हर्षल राजेंद्र भोसले यांनी फक्त ६५०० रु घेतले आणि उर्वरित १५०० रु त्या व्यक्तीला परत करीत सांगितले हे पैसे तुम्हाला चहा पाणी आणि जेवणासाठी राहू द्या

राजू भोसले यांच्या मुलाच्या या उदार मतवादी भूमिकेमुळे डोळ्यात पाणी आले आणि मी त्यास मागील आठवणी बाबत सांगितले तसा माझा आणि तुझ्या वडिलांचा परिचय ते मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष असतांना कै. स्वातंत्र्य सैनीक अण्णासाहेब सुपडू भादु पाटील यांचे नांव लो- कॉस्ट शॉपिंग सेंटरला द्यावे याप्रसंगी चांगलीच जवळीळ आली तदनंतर वेळोवेळी अनेक प्रसंगातून भेटी झाल्या परंतु मला आजही आठवते जेव्हा पाचोरा नगरपालिका सभागृहात राजेंद्र भोसले नगरसेवक होते त्यावेळी त्यांना पहिले पाकिट मिळाले तसे पाहीले तर नगरसेवक & पाकीट हे गणित अगदी जवळचे आहे कारण थेंबे- थेंबे तळे साचल्या प्रमाणे पाच वर्ष पाकीट जमा करायचे आणि पाच वर्षा नंतर त्या पाकीटातील रकमेच्या 4 पटीत पुन्हा निवडणुकीत खर्च करायची असो पाकीट मिळाल्या नंतर राजुभाऊना सहज म्हटले भाऊ आज पहिले पाकीट मिळाले आहे पार्टी तो बनती है तेव्हा त्यांनी सांगितले की मी सदरचे पाकिट नाकारले व पाच वर्ष घेणार सुद्धा नाही हे ऐकताच मला आश्चर्याचा धक्का बसला त्यांची ही भूमिका मला जरा चुकीची वाटली त्यामुळे मी त्यांना तेव्हाच सांगितले आपण जर ते पाकीट घेतले नाहीत तर ती रक्कम पुन्हा समप्रमाणात वाटप होईल किंवा मध्येच कुणीतरी ती गायब करेल त्यापेक्षा सदरचे पाकीट घ्या व गरजू रुग्ण & विद्यार्थ्यांसाठी आपण खर्च करा निश्चितच ती रक्कम सत्कारणी लागेल आणि खरोखर पाच वर्ष राजू भोसले यांनी हा उपक्रम सतत चालू ठेवला अर्थात याची परिणिती आणि पुण्याई ही कुटुंबीयांच्या व मुलांच्या वाट्याला येतेच म्हणूनच आज राजू भाऊंचे दोघेही मुलं आप-आपल्या क्षेत्रात अति उच्च स्थानावर आहे हे सर्व कर्माचेच फळ म्हणावे लागेल असो भोसले परिवाराच्या हातून अशाच प्रकारे गोरगरिबांची सेवा घडो ही अपेक्षा एवढेच नव्हे तर श्री मेडिकल सोडताना संबंधित मालक हर्षल यांनी सांगितले सर सरकारी दवाखान्यातील कोणताही रुग्ण असेल तर आम्ही त्यांना पडताळणी करून अत्यंत कमी किमतीत औषधी पुरवठा करणार आहे असेही स्पष्ट केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here