Breaking

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक- मालकावर भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या पथकाने केली कारवाई

0

भडगाव- तालुक्यातील गिरड येथे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या चालक – मालकावर भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर व ट्राली जमा करण्यात आली आहे. ही कारवाई दि.21 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी-पो.कॉ. स्वप्निल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील गिरड येथे गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा होऊन वाहतूक चालू असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांना मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक- सुशील सोनवणे पो. कॉ. ईश्र्वर पाटील, स्वप्निल चव्हाण, चालक- संभाजी पाटील यांचे पथक हे गिरड येथील गिरणा नदी पात्रात गेले. त्या ठिकाणी एका झाडाखाली न्यू हॉलंड कंपनीचे विना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली ही उभी होती. त्यामध्ये एक ब्रास वाळू भरलेली होती. या वरील चालकाने पोलिस पथक नजरेस पडल्याने चालक हा ट्रॅक्टर बंद करून तेथून पळून गेला. पथकाने या ठिकाणी पाहिल्यास विना परमिट अवैध वाळू वाहतूक करताना सापडल्याने भडगाव पोलिस स्टेशनला आरोपी- योगेश तुकाराम पाटील रा. गिरड ता. भडगाव व चालक (नाव माहीत नाही) या दोघाविरुद्ध भाग 5 गु.र.ण.64/2021 कलम 379,34 , पर्यावरण सौरक्षण अधिनियम कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहे. या कारवाई बाबत गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here