Breaking

बेरोजगार तरुणांसाठी तत्काळ पोलिस भरती निघावी यासाठी भडगाव शहरातील तरुणांनी दिले तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन

0

भडगाव-सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी तात्काळ पोलीस भरती निघावी या मागणीसाठी  तहसीलदार सागर ढवळे व पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांकडे शासनाने लक्ष देण्याची व तात्काळ पोलीस भरतीची निघावी अशी मागणी केली आहे. 

भडगाव शहरातील तरुणांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,अनेक दिवसांपासून राज्यातील पोलीस भरती रखडलेली आहे. त्यामुळे अभ्यास करूनही विद्यार्थी वैतागले आहे. भरती ला उशीर होत असल्याने काहींना वयातून निवृत्त व्हावे लागत आहे . काही मुलांनी भरती निघेल या आशेने दुसरा काहीच उद्योग न करता केवळ अभ्यासावर भर दिला . मात्र भरती अभावी निराशा पदरी पडली आहे. घरची परिस्थिती हलाकीशी असल्याने व 100% मोल मजुरी करणारी मुलांना पोलीस भरती एकमेव पर्याव होता.सदरक्षणाय खलनीग्रहाय या खाकीचा रुबाबदार नोकरीसाठी तरुणांनी आयुष्यच पणाला लावलेले दिसते . मात्र शासन भरती घेण्यात उशीर करीत असून निवडणूक काळात दिलेला शब्द पाळत नाही असा आरोपही तरुणांनी केला आहे. दिलेल्या निवेदनात पोलीस भरती तात्काळ निघावी, आधी मैदानी की लेखी परीक्षा व भरती कधी होईल याची ठोस तारीख जाहीर करावी अन्यथा जेरीस येऊन तरुण आंदोलन करतील असे निवेदन शासनाला देण्यात आले. 
यावेळी तहसीलदार सागर ढवळे, व पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना प्रातिनिधिक स्वरूपात दोन युवकांनी निवेदन दिले . या वेळी अनेक पोलिस भरती चा अभ्यास करणारे तरुण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here