Breaking

रि.पा.ई.चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या घरावर झालेला भ्याड हल्याचा भडगाव रि.पा.ई. तर्फे निवेदन देत जाहीर निषेध

0

भडगाव-भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष तथा रि.पा.ई.आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या घरावर काही अज्ञात गावगुंडांनी हल्ला करून वस्तूंची नासधुस केली व त्यांच्या परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून या घटनेचा भडगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर यांनी निषेध करीत तसे निवेदन तहसीलदार सागर ढवळे व पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना दिले आहे अश्या या गाव गुंडांचा त्वरित बंदोबस्त करून अज्ञात गाव गुंडांचा शोध घेऊन कड्क कार्यवाही करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी एस. डी. खेडकर, देविदास बाविस्कर, गुरुदास भालेराव,सिद्धार्थ सोनवणे,योगेश बाविस्कर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here