Breaking

भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबवा, वीज पुरवठा पूर्ववत करा व वीज प्रश्नावर आंदोलन करणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या,अन्यथा तीव्र स्वरूपाचे चक्का जाम आंदोलन- शेतकरी प्रदीप देसले यांच्या नेतृत्वखाली तहसीलदारांना निवेदन

0

भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात येऊन वीज पुरवठा पूर्ववत करणेबाबत व वीज प्रश्नावर आंदोलन करणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे.अन्यथा भडगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाचे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन शेतकरी प्रदीप देसले यांच्या नेतृत्वखाली तहसिलदार सागर ढवळे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन काळातील अव्वाच्या सव्वा बीलं पाठवून सर्वसामान्य वीजग्राहकांची फसवणूक केली आहे.ऊर्जामंत्री थकीत वीज माफीची घोषणा करतात आणि नंतर शब्द फिरवतात.राज्य शासनाच्या या जुलमी निर्णयाविरुध्द अनेक पक्ष व संघटना यांच्यावतीने रस्त्यावर उतरून हा निर्णय मागे घ्यावा म्हणून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबविण्यात येतील अशी घोषणा केली मात्र अधिवेशन संपताच पुन्हा शासनाने वीज तोडण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांची अवस्था मागील ३ वर्षांपासून सातत्याने होणारी अतिवृष्टी, अवकाळी पाउस व गारपीट यामुळे अत्यंत हलाखीची झाली आहे. मागील काही दिवसात भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास हिरावला गेला आहे त्यातच शासनाने शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे असताना उलट शेतकऱ्यांची वीज तोडणी वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरु आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या या महाविकास आघाडी सरकार व महावितरण कंपनीचा आम्ही जाहीर निषेध करतो. शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबविण्यात यावी व सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी असून शेतकऱ्यांसाठी जळगाव येथे आंदोलन करणारे चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व आंदोलक शेतकरी यांची झालेल्या अटकेच्या आम्ही निषेध करतो.
शेतकऱ्यांसह जनतेमध्ये वीज वितरण कंपनी विषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाल्याने शेतकरी आंदोलकांची ती साहजिक प्रतिक्रिया होती असे आम्ही मानतो. वरील सर्व बाबींचा विचार करता भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी व आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा भडगाव तालुक्यातील शेतकरी तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करतील व नंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे लेखी निवेदनात म्हटले आहे. या वेळी
प्रदीप देसले ,बबलू पाटील ,दत्तू मांडोळे ,मोनू पाटील ,मंगेश पाटील ,नकुल पाटील ,नवल पाटील ,योगेश पाटील ,अजय पाटील,अमोल मराठे यांच्या सह शेतकरी पुत्र उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here