Breaking

आमडदे येथे शाळेच्या मागे पत्त्यांचा डाव रंगला,पोलिसांनी धाड टाकताच डाव भंगला,१ लाख ९७ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल सह ९ दुचाकी पोलिसात जमा

0

भडगाव-तालुक्यातील आमडदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे निबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही लोक पैसे लावून जुगार(पत्ते) खेळतांना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळून आले . यात ८ जुगारीना अटक करून सुटका झाली असून बाकी ८ जुगारी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बाबत अधिक माहिती अशी की, दि ८ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास भडगाव पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आमडदे येथिल जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे पोलिस उपनिरीक्षक- सुशील सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल- स्वप्निल चव्हाण , पोलिस कॉन्स्टेबल -नितीन सोनवणे, या तीन जणांच्या पथकाने दुपारी छापा टाकला यात काही लोक पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. तर काही लोक जुगार खेळतांना आढळून आले . आठ हजार सत्तर रुपये रोख, व ९ दुचाकी मोटारसायकल असा एकूण १ लाख सत्यांनऊ हजार सत्तर रुपायांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .
या कारवाई ने तालुक्यात पत्ते खेळण्यांचे धाबे दणाणले. यात आरोपी जितेंद्र पाटील (२७), रावसाहेब पाटील, (२७), हिम्मत पाटील (३९), पिंटू वाघ (४०), गोरख पाटील (५५), सतीश पाटील ( ५०), विनोद भिल्ल (२७), राहणार सर्व आमडदे व यशवंत पाटील राहणार वडजी ता भडगाव , जुगार पट्टे खेळतांना व खेळवितांना आढळून आले . तसेच भोलेनाथ पाटील , रमेश भिल्ल, आप्पा केदार, प्रशांत पाटील, प्रकाश भिल, भिकन पाटील, आबा नाईक , रमेश कोळी रा. सर्व. आमडदे हे पोलिसांची चाहूल लागताच ठिकाणाहून पळून गेले म्हणून याबाबत भडगाव पोलिसात पोलीस हवालदार स्वप्नील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून
जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे, तसेच सद्या भारत देशात कोविड १९ या विषाणूच्या आजजाराने थैमान घातले असल्याने लागू केलेले कलम १४४ अन्वय संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून भादवी कलम १८८, २६९, २७० , सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान बडगुजर हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here