Breaking

पाचोऱ्यात भडगाव रोड वरील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
(मुकुंद बिल्दीकर यांची सजगता व पोलीस हवालदार राहुल बेहरे, किरण पाटील यांचा धाडसी पाठलाग)

पाचोरा- शहरातील भडगाव रोड वरील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
(मुकुंदआण्णा बिल्दीकर यांची सजगता व पोलीस हवालदार राहुल बेहरे, किरण पाटील यांचा धाडसी पाठलाग,
पिकअप व्हॅन सोडून चोरट्यांचे पलायन, श्वानपथक पाचारण)

मंगळवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास एटीएम च्या समोरील काच चोरट्यांनी फोडल्याचा आवाज ऐकून आशीर्वाद प्लाझाचे मालक मुकुंदआण्णा बिल्दीकर यांना जाग आली व त्यांनी लागलीच पोलीस हवालदार राहुल बेहेरे यांना त्याबाबत कळवले. त्या आधारे बेहरे यांनी पोलीस हवालदार किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला दोघे स्टेट बँके जवळ पोहोचले तोपर्यंत चोरटे पसार झाले.

दोघंही पोलीस कर्मचाऱ्यांनी भडगाव रोड, जारगाव चौफुली, जळगाव रोड, जामनेर रोड अक्षरशः पिंजून काढला. भडगाव रोड भागात पीक अप व्हॅन भरधाव जात असल्याचा संशय आल्याने राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. ते पिकअप व्हॅन चालकाच्या लक्षात आल्याने त्याने पांडव नगरीच्या रस्त्याने गाडी वळवली व गाडी मागे असलेल्या राहुल बेहरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी अंगावर आणली व पुन्हा पलायन करण्याचा प्रयत्न केला. अशाही परिस्थितीत न घाबरता राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी सदरची गाडी ही भट्टगाव रस्त्याला लावली पुढे रस्ता नसल्याने गाडी पिकप व्हॅन सोडून चोरटे पसार झाले .या गाडीत जाड दोरखंड , लोखंडी अवजारे असून एटीएम गाडीत टाकून नेण्याचा त्यांचा मानस असावा असा संशय आहे. भट्टगांव शिवारात गाडीतील साहित्याच्या आधारे श्वान पथकास पाचारण करून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत .मुकुंद बिल्दीकर यांची सजगता व राहुल बेहरे,किरण पाटील यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here