Breaking

असा राहील पाचोरा-15 ते 22 मे दरम्यान जनता कर्फ्यू ( १००% लॉक डाऊन) (आमदारांच्या नियोजनास सर्वपक्षीययांसह व्यापाऱ्यांचा पाठिंबा)

पाचोरा = सध्याची कोरोना बाधितांची व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन दुसऱ्या लाटमध्ये कोरोनाची घट्ट होत असलेली साखळी तोडण्यासाठी येत्या 15 ते 22 मे दरम्यान कडकडीत १००% पुर्ण दिवस बंद जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन व नियोजन आमदार किशोर पाटील यांनी करून सर्व पक्षीय पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचा विषय मांडला त्यास एकमुखी मान्यता देण्यात आली.


आमदार किशोर पाटील यांच्या शिवालय या संपर्क कार्यालयात शुक्रवारी दुपारी आमदार किशोर पाटील यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी , व्यापारी व मिडिया प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित केली. याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, शिवसेनेचे ॲड अभय पाटील ,जि प सदस्य रावसाहेब पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर ,गणेश पाटील, अय्युब बागवान, नगरसेवक वाल्मीक पाटील , रमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, युवक अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार, भाजपाचे जि प सदस्य मधुकर काटे ,पं स सदश्य सुभाष पाटील व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते .
या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रसारा संदर्भात भीती व दुःख व्यक्त करून ही साखळी तोडण्यासाठी काय करता येईल ? यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी यांची मते जाणून घेतली.तसेच सध्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून महसूल, पोलीस ,पालिका व आरोग्य विभागाचे सुरू असलेले प्रयत्न, पालिकेकडून नियमभंग करणाऱ्यांना वर होत असलेली दंडात्मक कारवाई यासंदर्भात माहिती देऊन सध्या सुरू असलेला सकाळी 7 ते 11 सुरु नंतर लॉकडाउन हा समाधानकारक नसल्याने व त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित होण्याचे चित्र दिसत नसल्याने लोकांचे जीव वाचवण्यासाठी 100% कडकडीत बंद जनता कर्फ्यू पाळणे क्रमप्राप्त असल्याचे मत आमदार किशोर पाटील यांनी मांडले त्यास उपस्थितांनी विविध मते मांडून मान्यता दर्शवली. या बैठकीत प्रथम ता 10 ते 17 मे दरम्यान जनता कर्फ्यू पाळावा असे ठरले परंतु ता 13 व 14 मे रोजी रमजान व अक्षय तृतीयेचा सण असल्याने कुणालाही अडचण होऊ नये म्हणून ता 15 ते 22 मे जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला .जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्यानुसार जुलै महिन्यात तिसरी लाट येणार असून आपण आतापासूनच योग्य ते नियोजन करून सजगता दाखवली तर अनेकांचे जीव वाचवता येतील. त्यासाठी जनता कर्फ्यूला प्रत्येकाने सहकार्य करावे, पैशा पेक्षा जीव महत्त्वाचे आहेत, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत असून रुग्णालयाचा खर्चही परवडत नाही. त्यामुळे कडकडीत जनता कर्फ्यू पाळावा. राज्य शासन 15 मे नंतर काहीही निर्णय घेवो त्यास बांधिल राहून पाचोरा व भडगाव तालुक्यात ता 15 ते 22 मे दरम्यान कडकडीत जनता कफ्यु राहील असा निर्णय घेण्यात आला. यात भाजीपाला व किराणा देखील बंद ठेवण्यात येणार असून दूध डेअरी सकाळी फक्त सात ते नऊ व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत तर मेडीकल मात्र सतत सुरु ठेवण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीत प्रदीप संचेती, अहजर खान ,अॅड अभय पाटील, अय्युब बागवान, संदीप महाजन, प्रा सी एन चौधरी,विकास पाटील, नंदकुमार सोनार आधी आदींनी मते मांडली बैठक सुमारे दीड तास चालली आमदार किशोर पाटील यांनी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा बाळगून आभार व्यक्त केले.

हम बोलेगा तो! बोलते की, बोलता है

*सद्य स्थितीत शासकीय नियम व आदेशा नुसार सकाळी 7-00 ते 11-00 पावेतो विशिष्ठ दुकानांना खुली राहण्याची परवानगी असली तरी आता सुद्धा 7 ते 11 मध्ये सर्रास सर्व दुकाने तर सुरुच आहे शिवाय भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला एका ठिकाणी बसुन विक्री न करता फिरते राहुन ( छोटा हत्ती किंवा लोटगाडीवर कॉलनी व गल्लीत फिरून)भाजीपाला विक्री करणे बाबत निश्चित केले असतांना कोणीही याचे पालन करतां ना दिसत नाही राजकीय लोक मतांमुळे त्यांना छुपा आशिर्वाद देतात तर अधिकारी व कर्मचारी दहशतीमुळे कारवाई करण्यास घाबरतात त्यामुळे प्रत्येक व्यवसाय धारक त्यांच्याकडे बोट दाखवत आपले व्यवसाय करतात त्यामुळे जनता कर्फुचा सर्व पक्षीय एकमुखी निर्णय असला तरी त्याचे पालन होते की सर्व पक्षीय निर्णयाला अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांच्या चुप्पीमुळे फियास्को होतो हे तात्कालीन स्थितीवर दिसेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here