Breaking

हम बोलेगा तो
बोलते की
बोलता है आ.किशोरआप्पांची जनता कर्फ्युची प्रतिष्ठा पणाला का?& कोणासाठी?

पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निवासस्थाना जवळील कार्यालयात दि. 7 मे रोजी सर्व पक्षीय म्हणजेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष अझहर खान राष्ट्रीय काँग्रेसचे जिंल्हा उपाध्यक्ष ॲड.अविनाश भालेराव,भाजपचे मधुकार काटे, सुभाष पाटील व निवडक व्यापारी बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वाढती कोरोना रुग्ण संख्या & त्यापेक्षा भयानक म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हृदयविकाराने मृत्युसह काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) यांचे वाढते प्रमाण यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊन सर्वानुमते त्यावेळी 15 मे ते 22 मे पावेतो जनता कर्फ्य अत्यंत कटक पाळण्याचे ठरले आजच्या प्रेसनोट नुसार तो कालावधी 15 मे ते 19 मे निश्चित केल्याचे जाहीर केले.
ही बैठक आमदार किशोरआप्पांनी जरी बोलवली होती परंतु कोरोना आजाराला गांभीर्याने घेऊन दुरदृष्टी ठेऊन तशी पाऊले उचलणारे जळगाव जिंल्ह्यातील नव्हे तर राज्यातील पहीले व एकमेव आमदार म्हणावेच लागेल कारण राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडण्याआधी शासनदरबारी आपल्या आमदार फंडातुन कोरोना प्रतिबंधात्मक औषधी,साहीत्य मागणी करणारे पहीले आमदार होते.
पहील्या लाटेच्या प्रसंगी केंद्र व देशातील सर्वच राज्य शासनाने जनतेचा वाढता रोष मतांची लाचारी लक्षात घेऊन लॉक डाऊन हटवण्याचा निर्णय घेतला जनतेने देखील आपण कोरोनावर विजय प्राप्त केला आहे या जोशात सर्वच बंधनाचे उल्लघन करीत दैनदिन जिवन सुरु केले परीणाम आज दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागत आहे ती सुद्धा साधी सोपी नाही तर रुग्ण व मृतांची सातत्याने वाढणारी संख्या ऑक्सीजन, व्हेटिलेटर,रेमडीसिव्हर, लसीचा तुतवडा, आरोग्य सेवकांची व बेडची कमतरता अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे

आपलं पाचोरा ठिक आहे असं म्हणायला आज तरी हरकत नाही परंतु शेजारच्या तालुक्यात, जिंल्हया राज्याबाबत न बोलले बरे तशी काही अंशी सत्य वस्तुस्थिती वाचायला, ऐकायला, बघायला मिळत आहे.

खरा वस्तुस्थितीचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप नुकताच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
काही अंशी जर फडणवीस साहेबांचे म्हणणे खरे असेल तर तिसऱ्या टप्याची कल्पना न केलेलीच बरी कारण आजच दुसऱ्या टप्या बाबत एवढे भिषण चित्र अनुभवास येत आहे & जर उद्या तिसरा टप्पा सुरु झाला तर लॉकडाऊन विरोधात बोलणारे तर सोडा परंतु ज्यांना आपणा माणसातील देव म्हणुन आज उपमा देत आहोत ते सुद्धा देवपण विसरून जातील. अशी वस्तुस्थिती आहे

कारण आजच प्रत्येक जण आप-आपल्या जबाबदाऱ्या झटकतांना दिसत आहे पहील्या टप्यात जे हात दानशुर म्हणुन पुढे आले आज दूसऱ्या टप्यात तो दानशुराचा झरा आटल्याचे दिसत आहे त्यामुळे मानवता सुद्धा या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हरवली असे म्हणावे लागेल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपर्यत जे जात-धर्म, गरीब-श्रीमंत, कष्टकरी- आरामदायी असा भेदभाव करीत त्या भ्रमात राहून त्या आधारे कोरोना लागणची विभागणी करीत होते आज त्याच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रत्येकाला आपली स्वतःच्या भ्रमाची जाणीव करून दिली आहे. हा आजार संसर्ग होतांना जात-पात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत काहीच पहात नाही हे ज्यांना झाले ज्यांनी गमवले त्यांना विचारा पहील्या लाटेत केंद्र सरकार मन की बात घेऊन तर राज्य सरकार लाईव्ह येत होते आज दुसऱ्या लाटेलाच जो- तो आप-आपल्या जबाबदाऱ्या झटकतांना दिसत आहे तर दुसऱ्या बाजुला अशा कठीण प्रसंगी निर्णय विभागीय,जिल्हा स्तरावर घेण्याचे स्वातंत्र्य देऊन मोकळे झाले आहे. थोडक्यात जनतेने त्यांच्या कर्मावर जगावे- मरावे असे चित्र आहे तर दुसऱ्या बाजुला जनता म्हणजे राजकीय पदधिकारी, शासकीय अधिकारी, व्यापारी जवळ-जवळ समाजातील सर्वच घटकांनी आपल्या जबाबदाऱ्या न ओळखता सर्व नियम- अटी धाब्यावर बसवुन जगणे सुरु केले आहे पर्यायाने कोरोना तिसऱ्या टप्याकडे वाटचाल सुरु केली आहे अर्थात वरील सर्वच घटक १००% या वाटचालीत सहभागी येत नसले तरी किमान 99% तरी वाटचाल करतांना आज तरी दिसत आहे.
म्हणुन आज तरी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमुद केल्याप्रमाणे जे भारतीय नागरिकाला हक्क आणि कर्तव्य सांगितले आहेत ते कटाक्षपणे अवलंब करण्याची आता खरी वेळ आली आहे. म्हणुन आज प्रत्येक नागरिकांने आप-आपल्या स्वार्थासाठी न जगता आज पर्यंत हक्काचा अधिकार सांगुन सरकार कडून पर्यायाने देशाकडे मागण्यांचा हक्क सांगत जगण्यापेक्षा प्रत्येकाला कर्तव्य म्हणून जबाबदारी पार पडण्याची म्हणजे देशाला देण्याची वेळ आली आहे असे केले तरच तरच आपण येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर मात करू शकतो व कोरोनाला हरवण्यात यशस्वी होऊ शकतो यासाठी एखाद्या आमदाराने किंवा शहराने किंवा तालुक्याने जनता कर्फ्यू लावुन व त्याचे पालन करून उपयोग नाही.तरीसुद्धा आप्पासाहेबांचा आमदार म्हणून आपल्या मतदार संघाचं देणं लागतो हा दुर दृष्टीकोन ठेऊन पाचोरा मतदार संघासाठी जो छोटासा प्रयत्न जनता कर्फ्यूचा केला आहे त्याला आजपर्यंत पाहिजे तसा इतर राजकीय पक्षांनी,त्यांच्या नेत्यांनी, व्यापारी व समाजातील सर्वच घटकांसह जनतेने प्रतिसाद दिलेला नाही हे कटू सत्य मान्य करावंच लागेल

जेव्हा स्वार्थासाठी निवडणूक लढवत असताना किंवा निवडणुकीनंतर सत्तेसाठी एकजूट होताना जे ध्येय – तत्व असतात ते बाजुला ठेऊन सहकार क्षेत्रात किंवा विकासकामांमध्ये राजकारण नाही चांगल्या कामाला आमचा पाठिंबा आहे असा नारा देत पुढच्या – मागच्या दाराने खुर्चीसाठी अर्थात % वारीसाठी एकजुट होण्याचे चित्र सर्वत्र आहे तेच तत्त्व आता स्वीकारून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकजूट होऊन संपूर्ण जिल्हास्तरावर कठोर जनता कर्फ्यू चे नियोजन करणे महत्वाचे आहे त्याच बरोबर या जनता कर्फ्यू मध्ये जरी शासकीय यंत्रणा कारवाई करू शकत नसली सक्रीय होऊ शकत नसली तरी ज्याप्रमाणे सर्वच कामे कायदेशीर करायचे असतात पण चौकटीत राहुन? या धोरणाप्रमाणे जनतेच्या हितासाठी सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा नेहमी प्रमाणे काम करतांना चौकटीच्या बाहेर न जाता या कोरोनावर विजय प्राप्त करण्यासाठी राजकीय व्यक्ती सोबत संकटापुर्वी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे अर्थात यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीसाहेब, मा.जिल्हाधिकारीसाहेब, जिल्हापोलिस अधिक्षक साहेब, यांच्यासारख्या ब्रम्ह- विष्णु- महेश या जिल्हयाच्या तीन सक्षम अधिकाऱ्यांसह प्रत्येक मतदार संघाचे आमदार, खासदार, नगराध्यक्ष, पं. स.सभापतीसह सर्वच राजकीय, पक्षांचे प्रमुख राजकीय पक्षांमधील गट- तट विसरुन सर्वच व्यक्तींनी एकजूट होऊन कोरोनाला आपल्या जिल्ह्यातून मुळासकट नष्ट होण्यासाठी एकजुट होणे महत्वाचे आहे वेळे प्रसंगी कारवाईची वेळ आली तर आपला-तुपला- चमचा न बघता कोणत्याही मतांच्या लाचारीचा विचार न करता कठोर पावले उचलली तरच जळगाव जिल्ह्यातून कोरोना मुळासगट नष्ट होण्यास वेळ लागणार नाही & हाच पॅटर्न संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभर जळगाव पॅटर्न म्हणून अवलंबवला जाईल हे निश्चित परंतु “मांजरीच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची” या उक्तीप्रमाणे सुरुवात कोणालातरी करावीच लागेल हे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here