Breaking

इदगाह मध्ये वृक्षारोपण
१०० झाडे जगवणार – फारूक शेख

जळगाव- कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले असून निसर्गाने अर्थातच अल्लाहने आम्हास खुल्या प्रमाणात ऑक्सीजन दिलेले आहे व ते टिकवण्यासाठी झाडे झुडपे लावण्याची सुद्धा अंतिम प्रेषितांनी ताकीद दिलेली असतानासुद्धा आपण पर्यावरणा चे संतुल न राखता त्याचे विध्वंस करत असल्याने अशा प्रकारे ऑक्सिजनचे महत्त्व आम्हास कळायला लागले त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरासमोर, आपल्या संस्थेत व ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी झाडे लावणे आवश्यक असल्याचे मत मुस्लिम ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी व्यक्त केले.
दोन वर्षात १०० झाडे जगवणार – ५७ झाडे जगवली

ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख व सहसचिव मनीष शाह यांनी मागील दोन वर्षात सुमारे ५७ झाडे लावून जगावली आहे व या वर्षी ४३ झाडे लावून शंभरी पूर्ण करणार असल्याचे फारुक शेख यांनी नमूद केले.
वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन करणारे जळगाव शहरातील मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्ट ही एक हरित क्रांतीची संघटना म्हणून उदयास आल्याची माहितीसुद्धा फारुक शेख यांनी यावेळी दिली.
यावेळी ईद गाह ट्रस्टचे एडवोकेट सलीम शेख, ताहेर शेख,अनिस शाह,मजहर खान व वहाब मलिक आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here