Breaking

अवैध वाळु वाहतुकीचे ट्रॅक्टर इतरांचे सोडतात माझे का? नाही असा आरोप करीत तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यावर तरुणाचा गळफास घेण्याचा प्रयत्न

भडगावः- अवैध वाळु वाहतुकीचे ट्रॅक्टर तहशिलच्या ताब्यात असताना रात्रीच्या अंधारात महसुलचे कर्मचारी ट्रॅक्टर परस्पर सोडतात मात्र माझे ट्रॅक्टर सोडले जात नाही. असा आरोप करत तहशिल कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यावर तरुणाने मफलरने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

या घटनेने बाबत आत्महत्तेचा प्रयत्न अथवा अन्य गुन्ह्याची पोलीसात नोंद नाही. तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न बाबत शहरात वाळुमाफीयात एकच खळबळ उडाली असुन या आत्महत्या दबावतंत्राची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगत आहे.
ालुक्यातील वाक येथिल संजय त्रिभुवन या तरुण १९ मे राजी रात्री ७ वाजेच्या सुमारास तहशिदार सागर ढवळे यांच्या कार्यालयात घुसुन इतराचे अवैध वाहतुकीचे ट्रॅक्टर सोडले जातात

माझे तहशिलच्या ताब्यात असलेले ट्रॅक्टर मात्र सोडले जात नाही. असा आरडाओरडा करत प्रशासनावर दबाव टाकत माझे ट्रॅक्टर सोडा नाही तर मी आत्महत्या करतो असे सांगुन तहशिल कार्यालयाच्या मुख्यगेट वर मफलरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असताना दिसुन आला होता. यावेळी तहशिलच्या आवारात हजर असलेल्या काही जणानी त्याला खाली उतरवत त्या तरुणाची समजुत काढुन रवानगी केली. या बाबत वडजी तलाठी शिंदे यांनी संजय त्रिभुवन विरोधात अर्ज दिल्याने भडगाव पो.स्टे.ला एन सी नोंदविण्यात आली आहे.


—————–या संदर्भात तहसीलदार यांनी आपली प्रतिक्रीया देतांना सांगीतले —————-
संजय त्रिभुवन या तरुणाने अवैध वाळुचे ट्राक्टर सोडण्यासाठी दबावतंत्र चा वापर केला त्याचे ट्राक्टर हे न्यायालयीन प्रक्रीयेत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव मुळे अवैध वाळु वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले होते. यापुढे अवैध वाळु वाहतुकदार विरुध्द दंडात्मक अथवा गुन्हा दाखलची कारवाई करण्यात येईल.
सागर ढवळे
तहशिलदार, भडगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here