Breaking

डॉ स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांच्या भूमिकेमुळे रुग्ण आनंदले सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये स्वतंत्र नॉन कोविड विभाग सुरू

पाचोरा -येथील भडगाव रोड भागातील भाग्यश्री प्लाझा मध्ये गेल्या दोन वर्षां पासून सेवा व समर्पण या हेतूने डॉ स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांनी सुरू केलेल्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने रुग्ण सेवेत अग्रणी स्थान मिळवून रुग्ण व व त्यांच्या नातलगांची अक्षरशः मने जिंकली आहेत.
कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या रुग्णांची होणारी हेळसांड व उपचारासाठी होणारा विलंब विचारात घेऊन डॉ स्वप्निल पाटील यांनी नॉन कोवीड रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्याने रुग्णांमधून आनंद व्यक्त होत आहे.


पाचोरा शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सारेच हैराण व भयभीत झाले. शासनाच्या आदेशानुसार सर्व खासगी रुग्णालये कोवीड सेंटर म्हणून ताब्यात घेतल्याने सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये डॉ स्वप्नील पाटील यांनी कोवीड रुग्णां साठीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत कोवीड केअर सेंटर कार्यान्वित केले होते. या सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट सातत्याने वाढत गेल्याने रुग्ण व त्यांच्या नातलगांनी सिद्धिविनायक हॉस्पिटलला उपचारासाठी प्रथम पसंती देऊन तेथे उपचार करून घेतले. सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मधील रूग्णसेवा व कामकाज मात्र सर्वांनाच समाधान कारक वाटले. हे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी सतत हाऊसफुल राहिले. तरीदेखील उपचारात कोणत्याही प्रकारचा आळस अथवा दिरंगाई डाॅ स्वप्निल पाटील यांनी केली नाही. त्यामुळे सिद्धिविनायक हॉस्पिटल सार्‍यांनाच दिलासादायी ठरले व ठरत आहे.

त्यामुळे सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची घटली आहे .
परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर आजाराच्या रुग्णांची होणारी कुचंबणा, हेळसांड व उपचारास होणारा विलंब पाहून अशा रुग्णांना देखील त्वरित व योग्य त्या उपचारांची गरज असल्याचे पाहून डॉ स्वप्नील पाटील यांनी सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये स्वतंत्र नॉन कोवीड विभाग सुरू करून या विभागातून रुग्णसेवा कोरोना व्यतिरिक्त ईतर रुग्णांची रुग्णसेवा सुरू केली आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरातील कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या रुग्णांनी उपचार व वैद्यकीय सल्ल्यासाठी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सुसज्ज, अत्याधूनिक यंत्रसामूग्रीने परिपूर्ण अशा स्वतंत्र नॉन कोवीड विभागाशी संपर्क साधून योग्य ते उपचार करून घ्यावेत असे आवाहन सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डॉ स्वप्निल पाटील यांनी स्वतंत्र नॉन कोवीड विभाग सुरू केल्याने रुग्ण व त्यांच्या नातलगांना मोठा दिलासा मिळाला असून नागरीकां मधून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाचोरा पालिका, पोलीस, महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन कोरोना योद्धा म्हणून कामकाज करत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शासनाचा लॉक डाऊन व स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करण्यात आले. आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलिस उप अधिक्षक भरत काकडे,तहसीलदार कैलास चावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ, पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील या अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत कोरोना साखळी तोडण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here