Breaking

निसर्गाच्या सांनिध्यात व शाकाहारी राहुन मुलचंद संघवी यांनी 78 व्या वर्षी कोरोनवर मात

पाचोरा- कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. किंबहुना पाचोऱ्यात तरी जवळ-जवळ कोरोना हॉस्पीटल खालीच झालेले दिसत आहे परंतु गेल्या काही दिवसांपासुन देशासह पाचोऱ्यात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्येत घट झाली आहे.

परंतु आजही धोका कायम आहे हे विसरून चालणार नाही. आपलं पाचोरा चांगले म्हणत असलो तरी देशात- राज्यात दररोज अडीच – तीन लाखांहून अधिक रुग्णांनी नोंद होत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे. त्यामुळे अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. ही आजही वस्तुस्थिती आहे. पाचोरा तालुक्यातील नंदीचे खेडगाव येथील रहिवाशी ब्रिजलालशेठ संघवी यांचे चुलतभाऊ मुलचंद घेवरचंद संघवी वय-78 यांच्या बाबत मात्र वेगळाच अनुभव आला.

मुलचंदशेठ संघवी (78) यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. ब्रिजलालशेठ यांनी धावपळ करीत मुलचंदशेठ यांना पाचोरा येथील कोविड सेंटरला आणले तेथे त्यांची तपासणी केली असता त्यांचा CT स्कोर-20 तर ऑक्सीजन लेव्हल 70 असल्याने संघवी परिवार चिंतेत पडला मुलचंदशेठ यांचे वय बघता या वयात रेमडी.& हायपॉवर औषध देणे कितपत योग्य आहे याचा विचार करत असतांना आता जे होईल ते होईल मला घरी घेऊन चला असे मुलचंद संघवी यांनी सांगीतले एवढा CT स्कोर &ऑक्सीजन लेव्हल असतांना देखील रुग्णाची कोरोनावर मात करण्यासाठी एवढी जिद्द बघुन ब्रिजलाल शेठ यांनी आपल्या चुलत भावाला मुळगावी नंदीचे खेडगाव येथे नेले.

घर निसर्गरम्य वातावरणात असल्याने त्याचा पुरेपुर फायदा घेत मुलचंदशेठ यांनी कोणत्याही प्रकारचे हाय पॉवरचे इंजेक्शन- गोळ्या न घेता सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे आणि रोज १.३० तास कोवळया उन्हात बसणे तसेच खाण्याची नियमीत वेळ व शुद्ध शाकाहार यावर सतत भर दीला आणि स्वतः ला निसर्गरम्य वातावरणात एकरूप करून घेतले परीणाम असा की ५ ते ६ दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पूर्ववत झाली. दहा दिवसांत कोरोनावर मात करून ते अगदी ठणठणीत बरे झाले
दहा दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सामान्य झालं. हळूहळू त्याच्या छातीतील वेदनादेखील कमी झाल्या. श्वास घेण्यातील अडचणी दूर झाल्यानं संघवी परिवाराला आत्मविश्वास वाटू लागला. त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल देखील निगेटिव्ह आला. अवघ्या १० दिवसांत निसर्गाच्या सानिध्यात राहून, नियमीत व्यायाम व शुद्ध शाकाहार करून कोरोनावर मात केली. शेवटी रुग्णाचा स्वतःचा आत्मविश्वास व प्रतिसाद महत्वाचा असतो अशी ब्रिजलालशेठ संघवी यांनी ध्येय न्युजशी बोलतांना सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here