Breaking

आता 18 ते 44 वयोगटासाठी लस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. ( तरी सुद्धा पाचोरा-भडगाव येथे वार्ड व गावनिहाय लसीकरण नियोजन गरजेचे )

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाला (Corona) रोखण्यासाठी लसीकऱण (Vaccination) मोहिम सुरु आहे. यासाठी कोविन अॅप (COWIN App) असून त्यावर नोंदणी करून लस घेता येते. सुरुवातीला सुरळीत सुरु असणारे पोर्टल जेव्हा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केल्यानंतर मात्र डाऊन झाले. त्यानंतर बुकींग करणं, स्लॉट ठरवणं यामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. आता सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोणत्याही पूर्व नोंदणीशिवाय सरकारी लसीकरण केंद्रावर लस घेता येणार आहे.


याची सुरुवात आजपासून झाली आहे. (on site vaccination for 18 to 44 age group to all government centre
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं की, आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही.

जनतेने जसा जनता कर्फु प्रामाणीक पणे पाळला आता लसीकरण देखील प्रामाणीक पणे व्हावे त्यासाठी पाचोरा-भडगाव शहर तालुक्यात व्हॅक्सीनकाम वितरण कामी सर्व पक्षीय नियोजन महत्वाचे

पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोरआप्पा पाटील व सर्व पक्षीय मान्यवरांच्या आवहानाला प्रतिसाद देत जनतेने जसा जनता कर्फ्यु शहर व तालुक्यातील जनतेने प्रामाणिक पणे पाळला तसं जनतेला वॅक्सिंगची लस देणे कामी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या अंधाधुंद कारभार व चुकीच्या नियोजनामुळे सर्वसामान्य लोकांना फारच त्रास सहन करावा लागत आहे

यासाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली तालुका शहर आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्व पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक बोलावून शहरात विद्यमान व भावी नगरसेवक तसेच सर्व पक्षीय पदधिकारी यांच्या मदतीने वार्ड निहाय तर ग्रामीण भागात पंचायत समिती गटातील गाव निहाय स्तरावर लस देण्याची दिनांक वार व वेळ निश्चित केली तर सर्व काही सुटसुटीत व सुरळीत पणा निर्माण होईल.

तरी सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी सर्वपक्षीय मान्यवरां समवेत आरोग्य अधिकारी त्यांच्या टिमची बैठक लावणे आवश्यक आहे या बैठकीत जे पण नियोजन होईल ते प्रसारमाध्यमांकडे प्रसारणासाठी दिले तर जनतेला सहज समजेल & जनतेकडून आनंद व्यक्त केला जाईला तरी या बातमीची दखल सर्वपक्षीय मान्यवरांनी, प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी अशी अपेक्षा ध्येय न्युजच्या वतीने केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here