Breaking

कोरोणा बाधित रुग्णावर यशस्वी अँजिओप्लास्टी
विघ्नहर्ता’ हॉस्पिटलमध्ये ‘डॉ अंकुर झंवर’ यांच्या अथक परिश्रमातून मिळाले जीवदान !

पाचोरा–कोरोना बाधित रूग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन रुग्ण मृत्यूशी झुंज देत असतानाच पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर अंकुर झंवर यांच्या अथक परिश्रमाने व योग्य उपचाराने तात्काळ ऍन्जिओग्राफी करीत रुग्णाचे प्राण वाचण्याची अद्भुत घटना नुकतीच पाचोरा येथे घडली आहे.

मात्र कोरोनाच्या उपचारात रक्त घट्ट झाल्याने हृदयावर उपचार करणे अवघड होते.अशावेळी  ह्याच हॉस्पिटलमध्ये  उपचार देणारे डॉ अंकुर झंवर यांनी सदर रुग्णास रक्त पातळ होण्यासाठी इंजेक्शन देऊन तात्काळ अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.सदर रुग्णाच्या हृदयाकडील रक्त वाहिन्यात ९०% ब्लॉकेज  झाल्याचे चाचणी स्पष्ट झाले.अशावेळी रुग्णांचे जिवावर बेतले. डॉ झंवर यांनी मोठ्या शिताफीने उजव्या हाताततून एंजिओग्राफी करीत ब्लॉकेज साफ़ केले व एंजिओग्राफी केली.यामुळे रुग्णाला कोरोनातून व हृदयविकाराच्या झटक्यातून सावरत जीवदान मिळाले.म्हणतात ना ‘देव तारी त्यास कोण मारी’.अखेर त्या वृद्धाची जीवघेण्या आजारातून सुटका झाली.

याबाबत प्राप्त माहिती अशी की दादाजी दौलत निकम रा जामनेर ६५ वर्षे वयाच्या वृद्धास कोरणा ची बाधा झाली होती. कोरोनाच्या उपचारा साठी निकम यांना पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी दादाजी निकम यांना कोरोना प्रादुर्भावातच हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यावेळी दादाजी निकम यांच्या जीवावर बेतले असतानाच विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषण मगर, डॉ सागर गरुड यांनी कोरोनावर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here