Breaking

बाजार समितीच्या गत वैभवासाठी प्रयत्न
– मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांची ग्वाही, प्रशासक मंडळाने घेतला पदभार

0
758

पाचोरा- भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या आर्थिक विवंचनेत असून शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल, मापाडी,कर्मचारी यांचेही विविध प्रश्न भेडसावत आहेत या सर्व अडचणी, समस्या व आर्थिक विवंचनेचा सांगोपांग विचार करून तसेच शेतकरी व व्यापारी हिताचे निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून बाजार समितीच्या गत वैभवासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्य प्रशासक तथा माजी आमदार दिलीप वाघ यांनी पदभार स्वीकारताना दिली.


जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशान्वये शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय प्रशासक मंडळाने शनिवार ता 29 रोजी सकाळी बाजार समितीचा पदभार स्वीकारला. दिलीप वाघ मुख्य प्रशासक असून या प्रशासक मंडळात

शिवसेनेचे ॲड अभय पाटील, चंद्रकांत धनवडे, युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत पाटील, अनिल महाजन, राष्ट्रीय काँग्रेसचे शिवाजी पाटील यांनी पदभार स्वीकारला. बाजार समितीचे सचिव बी बी बोरुडे यांनी पदभारा संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून प्रशासक मंडळातील सर्व सदस्यांचे स्वागत केले.

यावेळी पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या मदतीने प्रशासक मंडळ नियुक्त झाले असून बाजार समितीतील गतकाळातील सर्व व्यवहार तसेच शेतकरी ,व्यापारी, आडते, हमाल, मापाडी यांच्या विविध समस्या ,कर्मचाऱ्यांचे प्रश्न सर्व समजावून घेऊन बाजार समितीच्या गतवैभवासाठी केलेल्या नियोजनानुसार कामकाज केले जाईल. शेतकरी व व्यापारी हितावर भर असेल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणावा व शेतकऱ्यांच्या हिताच्या या संस्थेच्या गतवैभवासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिका गटनेते संजय वाघ ,तालुकाध्यक्ष विकास पाटील,शहराध्यक्ष अझहर खान, सतीश चौधरी ,नगरसेवक वासुदेव महाजन ,अशोक मोरे, विनय जकातदार ,प्रकाश निकुंभ,डिगंबर पाटील, सुनील पाटील, दगाजी वाघ, विजय पाटील, नाना देवरे ,प्रकाश पाटील ,नितीन तावडे, संजय सूर्यवंशी, दत्ता बोरसे,सुदर्शन सोनवणे, प्रदिप वाघ, हारून देशमुख, ॲड अविनाश सुतार , गोपी पाटील, योगेश पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते .
व्यापारी मंडळ ,सुवर्णकार मंडळ ,तेली समाज ,राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मुस्लिम मंडळाच्या वतीने मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांचेसह प्रशासक मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पदभार स्वीकारल्यानंतर सचिव व मुख्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून बाजार समितीची सद्यस्थिती प्रशासक मंडळाने समजावून घेतली’ रणजीत पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here