Breaking

कृष्णापुरी सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन प्रकाश चौधरी यांच्यासह पदाधिकार्‍यांचा सत्कार

0
153

पाचोरा – येथील सहकार क्षेत्राचा आदर्श ठरलेल्या कृष्णापुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन प्रकाश एकनाथ चौधरी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.


कृष्णापुरी विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली’ त्यात सभासद हिताच्या विविध विषयांवर चर्चा होऊन चेअरमनपदी प्रकाश एकनाथ चौधरी व व्हाईस चेअरमनपदी ओमप्रकाश पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
सारोळा शिवारातील नागणे फार्म हाऊसच्या प्रांगणात कृष्णापुरी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले. सोसायटीचे मार्गदर्शक, माजी चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे यांच्या हस्ते प्रकाश चौधरी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सतीश चौधरी, माजी चेअरमन दिलीप नागणे, डिगंबर अहिरे ,हेमंत चव्हाण,डी एस पाटील, प्रा सी एन चौधरी, सोसायटीचे सचिव नारायण चौधरी उपस्थित होते. सतीश शिंदे यांनी सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतला. नारायण चौधरी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here