Breaking

मोफत रुग्णवाहीका ; आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

0
159

भडगाव- कोरोणा काळात अनेक गरजू रुग्णांची गैरसोय होत असल्याने रुग्णांची गैरसोय दूर व्हावी व वेळेत उपचार मिळवा तसेच “रुग्ण सेवा हीच खरी ईश्र्वर सेवा” याप्रमाणे भडगाव शहरात स्व. बापुजी फाउंडेशन च्या वतीने मोफत रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी रूग्णवाहीकेचे फित कापुन उद्घाटन केले.

यावेळी मा नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, मा.नगराध्यक्ष प्रशांत पवार, बापूजी फाउंडेशन चे अध्यक्ष व युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, युवराज पाटील, दीपक पाटील, गुलाब पाटील, मधुकर वाडेकर, पिन्टु मराठे, आबा महाजन, शिवाजी महाजन, जहाॉगीर मालचे,विजय पाटील,रवि पाटील, ईश्वर पाटील, युवराज पाटील, बन्टी सोनार,विनोद पाटील, किशोर पाटील, गंभीर पाटील, योगेंद्र पाटील, हर्षल पाटील,चेतन पाटील, मुख्तार पाटील, रविंद्र पाटील, सुनिल पाटील, कपिल पाटील,दिनेश पाटील, सचिन पाटील, जयसिंग राठोड, प्रशांत गालफाडे, जावेद भाई, मोसीम भाई,भोला पाटील, प्रशांत सोनवणे,विशाल पाटील,अमोल पाटील,भैय्या पाटील,आदी उपस्थित होते. या वेळी आमदार किशोर पाटील यांनी स्व.बापूजी फाउंडेशन भडगाव शहरात अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असे कार्य करत असून आज पुन्हा मोफत रुग्णवाहिका लोकार्पण करून पुन्हा एकदा जनसेवेचे कार्य सुरू ठेवले म्हणून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here