Breaking

पाचोरा – भडगाव मध्ये ११ ते ५ वेळ करा :नाभिक व्यवसायाला परवानगी द्या- सचिनदादा यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचे उप-जिल्हाधिकारी यांना निवेदन

पाचोरा (प्रतिनिधी) -लॉकडाउन मध्ये व्यापारी वर्गाची वेळ बदलवुन मागिल काळातील जळगाव पॅटर्न लावावा वेळ ११ते ५करुन नाभिक समाजाला परवानगी द्यावी अशी मागणी कॉग्रेस ने आज प्रातंअधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

कोरोना महामारीत व्यापारी बर्बाद झाले आहे आर्थिक व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहे त्यामुळे सद्यस्थितीत शासनाने लॉकडाउन मध्ये शितीलता आली आहे मात्र वेळ सकाळी ७ ते दुपारी २ ची देण्यात आली आहे. त्यामुळे ही वेळ मागिल काळात ज्या प्रकारे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती तोच जळगाव पॅटर्न राबविण्यात यावा यामुळे व्यापारी पेठेत गर्दी कमी होईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाला मदत होईल अशी मागणी कॉग्रेस ने करीत यासोबतच नाभिक समाजावर अन्याय होत असुन उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने कोरोना नियमावली देउन नाभिक समाजाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी ही मागणी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह पदाधिकारी यांनी करीत निवेदन दिले आहे.

सदरचे निवेदन हे प्रातंअधिकारी राजेंद्र कचरे यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस मनियार,शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, तालुका युवक अध्यक्ष संदीप पाटील, महिला आघाडीच्या अॅड मनिषा पवार, कुसुम पाटील, शिला सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,एन एस यु आय चे साई पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रातंअधिकारी राजेंद्र कचरे यांना मागिल जळगाव पॅटर्न कसा योग्य होता यावर चर्चा झाली श्री कचरे यांनी कॉग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन दिले की आपली मागणी योग्य असुन तात्काळ ही जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवुन चर्चा करुन लवकरच अमंलात कशी येईल यावर विचार केला जाईल.त्यातच नाभिक समाजाचे दुकाने मागिल काळातील नियम व अटी शर्ती करून कसे सुरु केले जातील हे देखील जिल्हाधिकारी यांना सांगितले जाईल असे आश्वासित कॉग्रेस शिष्टमंडळाला केले. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here