Breaking

बाजार समिती सर्व सुविधांनी सुसज्ज करणार :प्रशासक मंडळाने केले नियोजन 12 तासाच्या आत शब्दपुर्तीच्या मोहीमेला सुरवात – – कृ.उ.बा.प्रशासक मंडळ हे आगामी युतीचे ट्रेलरच

0
713

पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त प्रशासक मंडळाने बाजार समिती आवाराची पाहणी करून तसेच शेतकरी ,व्यापारी, हमाल मापाडी यांच्याशी सुसंवाद साधून अडचणी जाणून घेतल्या व त्या आधारे बाजार समितीतील सुविधा वाढविण्याचे नियोजन केले. यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांचेसह प्रशासक मंडळातील अनिल महाजन, युवराज पाटील, रणजीत पाटील,अभय पाटील, चंद्रकांत धनवडे, शिवाजी पाटील यांनी बाजार समितीच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली .व्यापारी ,शेतकरी, हमाल, मापाडी यांच्याशी संवाद साधला व बाजार समिती सभागृहात बैठक घेतली. यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते .
प्रशासक मंडळाच्या वतीने मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्या हस्ते आमदार किशोर पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच आमदारांच्या हस्ते दिलीप वाघ यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी बाजार समितीतील विविधांगी सोयी,सुविधां संदर्भात आमदार किशोर पाटील, दिलीप वाघ यांनी माहिती दिली.
गुरांचा बाजार पूर्ववत
बाजार समिती अंतर्गत नगरदेवळा येथे दर सोमवारी व वरखेडी येथे दर गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार येत्या सोमवार पासून पूर्ववत सुरू होईल. पशुधन मालकांनी व व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. शेतकरी निवास सुसज्ज करणार बाजार समिती आवारातील शेतकरी निवास स्थान शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्यात येणार असून यासाठीचे काम सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. या शेतकरी निवासात शेतकरी बांधवांच्या विश्रांती सह चहापानासाठी कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. अल्पदरात भोजन
बाजार समिती व व्यापारी मंडळाच्या वतीने बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी अल्पदरात उत्कृष्ट भोजन देण्यात येणार असून लवकरच त्याची सुरुवात होईल असे सांगण्यात आले.
कोवीड सेंटर सुरू करणार
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता व भीती वर्तविण्यात येत असल्याने बाजार समितीच्या वतीने सुसज्ज असे कोवीड सेंटर उभारण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असल्याचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले.
परिसर स्वच्छ सुंदर करणार बाजार समिती आवारात सकाळी भाजीपाला लिलाव होतो तसेच व्यापारी व शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. परिसरातील स्वच्छता नियमितपणे केली जात नाही,दूर्गंधी पसरून आरोग्याची भीती निर्माण होते अशा तक्रारी संदिप महाजन यांचेसह परिसरातील रहिवाशां कडून करण्यात आल्याने बाजार समितीचा संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात येईल. तसेच फवारणी करून दुर्गंधी नष्ट केली जाईल .एक दिवसा आड संपूर्ण परिसर फवारणी करून स्वच्छ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पावसाळा पूर्वनियोजन

पावसाळा सुरू झाला असून या काळात बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेले शेती उत्पादन खराब होऊ नये, शेतकऱ्यांना त्रास व मनस्ताप होऊ नये ,व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या धान्याची नासाडी होऊ नये यासाठी पावसाळापूर्व नियोजन केले असून बाजार समिती आवारातील सर्व शेडची गळती थांबवून तेथेच लिलाव अथवा मालाची साठवणूक करण्यात येणार आहे.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील, मुख्य प्रशासक दिलीप वाघ ,अनिल महाजन, रणजीत पाटील यांनी या नियोजनासंदर्भात माहिती दिली. अनिल महाजन यांनी आभार मानले.

12 तासाच्या आत शब्दपुर्तीच्या मोहीमेला सुरवात

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे मा.आ. दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले
या प्रशासक मंडळाने काल दि.4 जुन रोजी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थीत पत्रकारां समवेत चहा- पाण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता यावेळी चर्चे प्रसंगी कृ.उ. बाजार समिती तर्फे 4 महत्वपुर्ण निर्णय जाहीर करण्यात आले
त्यात प्रामुख्याने कृ.उ. बाजार समीती मधील गटारी व परिसर सफाईसह कचरा उचलणे हे काम पावसाळ्यापुर्वीच नव्हे तर नियमीत उचलण्यात येईल असे सांगीतले या घोषणेला 12 तास होत नाही तोपर्यंत युद्ध पातळीवर मार्केट कमेटीत सफाई मोहिम हाती घेतल्याचे दिसुन येत आहे
अशा प्रकारची शब्दपुर्ती व कार्य तत्परता& एकमुखी निर्णय राहीला तर पाचोरा विधानसभा मतदार संघात एकतर्फी महाविकास आघाडीची सत्ता आल्या शिवाय राहणार नाही एवढेच नव्हे तर कृ.उ.बा.प्रशासक मंडळ हे आगामी युतीचे ट्रेलरच म्हटले तर चुकीचे ठरणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here