Breaking

शासकीय योजनेत येणाऱ्या रुग्णास वैद्यकीय उपचार, औषधी सह प्रवास भाडे देऊन वृंदावन हॉस्पीटल परिवाराने जोपासली मानवता

0
454

पाचोरा शहरातील बायपास हायवे रेल्वे उड्डान पुलाजवळील डॉ. निळकंठ पाटील & डॉ. विजय पाटील संचलीत वृंदावन हॉस्पिटल म्हणजे नुकतेच पाचोरा शहरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसह अनेक शासकीय योजने आधारे गरजु रुग्णांना मोफत उपचाराचे दालन म्हणुन चर्चेत आहे.


महाराष्ट्राचे कृषीमंत्री ना. दादाभुसे यांनी नुकतीच नासीक येथील कोवीड सेंटरला भेट देऊन तेथे चाललेला गैरकारभार चव्हाट्यावर आणला सदरची ती क्लीप सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणावर व्हायलर देखील होत आहे.
एका बाजुला शासनाकडून शासकीय योजने अंतर्गत रुग्णांवर उपचार केलेले अनुदान लाटायचे आणि दुसऱ्या बाजुला योजनेचा लाभ घेणाऱ्या गरजु रुग्णांना प्राथमीक तपासणी फी च्या नावाने रक्कम वसुल करण्याची पद्धत देखील नविन नाही शिवाय गरजु रुग्णदेखील शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे म्हणून थोडीफार रक्कम देण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जो रुग्ण योजनेमध्ये बसत असेल त्याला तपासणी फी सह संपूर्ण औषधोपचार व मेडिकल देखील देण्याची तरतूद आहे याच बाबींना प्रामाणिक राहून पाचोरा येथील वृन्दावन हॉस्पिटल चे संचालक डॉ.निळकंठ पाटील यांनी आज एका लाभार्थी महिलेची मोफत डिलेव्हरी केली

एवढेच नव्हे तर सोबत लागणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधीचे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले नाही. किंबहुना मानवता जोपासत रुग्ण महिलेस घरी जाण्यासाठी देखील भाड्याला पैसे दिले

यासंदर्भात वृंदावन हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर नीळकंठ पाटील यांनी धनुष्य बोलताना सांगितले यापुढे जोही गरजू रुग्ण येईल तो जर शासनाच्या योजनेत बसत असेल त्याला देखील वैद्यकीय उपचारासह तपासणी व मेडिकल औषधीची रक्कम देखील लागणार नाही म्हणुन
गरीब गरजु रूग्णांनी वृंदावन हॉस्पिटल मधील सुरू करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनेसह महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ निळकंठ पाटील व त्यांचे बंधु डॉ. विजय पाटील यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here