Breaking

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
549


पाचोरा – येथील तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाचा स्थापना दिवस वर्धापन दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात पांढरा गणवेश व डोक्यावर टोपी घालून पारंपारिक वेशात या कार्यक्रमात सहभागी झाले

.
वर्धापन दिनानिमित्ताने रेल्वेस्थानक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला. ध्वजस्तंभाचे पूजन श्रीफळ वाढवुन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचा जयघोष केला .


याप्रसंगी दिलीप वाघ ,पालिका गटनेते संजय वाघ, नितीन तावडे, विकास पाटील, अजहर खान, नगरसेवक वासुदेव महाजन ,अशोक मोरे ,नाना देवरे,भूषण वाघ, सतीश चौधरी, प्राचार्य एन एन गायकवाड, सुदाम वाघ, उमेश एरंडे ,शांताराम चौधरी, अजय अहिरे, शालिग्राम मालकर, चंदू केसवानी ,संजय सूर्यवंशी, बशीर बागवान, जनार्दन पाटील, विजय पाटील, अॅड अविनाश सुतार, हारुण देशमुख ,बाबाजी ठाकरे, सुदर्शन सोनवणे, प्रदिप वाघ, कोमल वाघ, अशोक महाजन, नरेंद्र ठाकरे, प्रा भागवत महालपुरे, प्रकाश पाटील ,सुनील पाटील, गोपी पाटील, रणजीत पाटील,अरूण पाटील, शांताराम चौधरी, प्रा आर एस मांडोळे, महिला आघाडीच्या सुचेता वाघ, ज्योती वाघ, सरला पाटील, प्रा मंगला शिंदे, सुनिता देवरे, जयश्री मिस्तरी, प्रा सुनिता गुंजाळ, दीपमाला पाटील आदी उपस्थित होते.


याप्रसंगी दिलीप वाघ यांनी पक्षाच्या विकासात्मक धोरणासंदर्भात उपस्थितांना माहिती देऊन पक्षाच्या लाभार्थी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ए जे महाजन यांनी केले. अजहर खान यांनी आभार मानले. कोरोना योद्ध्या सन्मान= ध्वजारोहणानंतर हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात पक्षाच्या वतीने आरोग्य, पालिका, महसूल, पोलीस, मिडीया यासह विविध क्षेत्रातील कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कोरोना योध्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देखील पद पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here