Breaking

पाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर

0

पाचोरा – उपविभागातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळ मुख्यालयी दिनांक २३, २४ आणि २५ जून, २०२१ रोजी ७/१२ दुरुस्ती शिबीर होणार आहे.
मा. विभागीय आयुक्त नाशिक यांच्या आदेशानुसार व मा.जिल्हाधिकारी जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकारी यांच्या मुख्यालयात हे शिबीर असणार आहे. यामध्ये ७/१२ मधील गुणवत्ता आधारित विविध दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. सदर शिबीराचा लाभ विविध शेतकरी तसेच ईतर सर्व खातेदार यांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी पाचोरा तसेच तहसिलदार पाचोरा आणि भडगांव यांनी केले आहे. सध्या कोविड -१९ बाबतच्या उपाययोजना पाहता एकाच दिवशी खातेदार व शेतकरी यांनी गर्दी करू नये म्हणून सदर शिबीर ३ दिवस आयोजित केले आहे.

पाचोरा तालुका –
महसूल मंडळ आणि शिबिराचे ठिकाण

१) पाचोरा – तहसील कार्यालय मधील सभागृह.
२) गाळण – मंडळ अधिकारी कार्यालय.
३) कुऱ्हाड – मंडळ अधिकारी कार्यालय.
४) पिंपळगांव (हरे) – मंडळ अधिकारी कार्यालय.
५) वरखेडी – मंडळ अधिकारी कार्यालय.
६) नांद्रा – मंडळ अधिकारी कार्यालय,ग्रा. पं. ईमारत.
७) नगर देवळा – मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रा. पं. कार्यालय ,तळ मजला.

भडगांव तालुका :
महसूल मंडळ आणि शिबिराचे ठिकाण

१) भडगांव – तहसील कार्यालय, ईमारत शेजारी, चावडी.
२) आमडदे – मंडळ अधिकारी कार्यालय.
३) कजगांव – मंडळ अधिकारी कार्यालय.
४) कोळगाव – गाव चावडी.

शिबीर अंतर्गत पुढील बाबींचा समावेश असेल :
१) ७/१२ मधील चुका दुरुस्त करणे.
२) संगणकीकृत ७/१२ चे वाचन
३) नवीन फेरफार नोंदी दाखल करण्यासाठी ची कार्यवाही.
४) प्रलंबित नोंदी ची निर्गती व प्रमाणित ७/१२ वितरण
५) विविध स्वरूपातील अहवाल दुरुस्ती करणे.

शिबिराची वेळ- कार्यालयीन वेळ.

विशेष सूचना – कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सर्व उपस्थित खातेदार आणि शेतकरी यांनी मास्क वापरावा. शिबिरात उपस्थित राहताना आपल्या कामा संबंधी आपल्या कडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे व एखादा विषय न्याय प्रविष्ट असेल तर त्या बाबतची अद्यावत माहिती सह उपस्थित राहावे ही विनंती,जेणे करून आपल्या बाबीवर तात्काळ निर्णय घेणे उचित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here