Breaking

चोपडा काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांचा सत्कार

0

चोपडा– दिनांक 23 जून 2021 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नाना पटोले यांचा जळगाव जिल्हा दौरा झाला. अमळनेर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व किसान रॅलीत त्यांचे आगमन झाले असता चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांचा सत्कार व स्वागत करण्यात आला

यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री के. डी. चौधरी सर, चोपडा शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. सुप्रियाताई कांतीलाल सनेर ,चोपडा शहर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, एन. एस. यु .आय. राज्य सचिव श्री चेतन बाविस्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला .यावेळी काँग्रेसचे चोपडा येथील कार्यकर्ते, जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय ॲड श्री संदीप सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्री , अजबराव पाटील, श्री नंदकिशोर सांगोरे, श्री राजेंद्र भास्करराव पाटील, श्री प्रदीप पाटील, फातिमा जागीरदार ,देवकांत चौधरी, आरिफ शेख, इलियास पटेल, एडवोकेट एस .डी पाटील श्री रमाकांत सोनवणे, सय्यद साहेब आदी अनेक कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here