Breaking

 … छान शाळेला विद्यार्थी नाही शिक्षकांची मज्जा समजत असाल नाही का?

0

पाचोरा- पण आज विद्यार्थी – पालक जेवढे शाळेची अपेक्षा करत आहे त्यापेक्षाही जास्त शिक्षक कारकुनी कामांना त्रस्त झाले आहेत रोज चे येणारे नविन- नविन परिपत्रके, सुचना, विद्याथ्यांचे बँक अकाऊंट ओपन करणे, स्वाध्याय सोडवणे, सेतु प्रश्न पत्रीका सोडवणे (अर्थात हे ठराविकच शाळा, शिक्षक- विद्यार्थी करतात हा भाग वेगळा )

दुसऱ्यां बाजुचा विचार केला तर

शासनाने जरी संभाव्य कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन बऱ्याचशा ठिकाणी विद्यार्थी हितासाठी शाळा बंद ठेवलेल्या असल्या तरी शाळेचे शिक्षक मात्र सर्रास पणे आपल्या घरी शिकवण्या घेत आहे & शाळेत जर एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारले तर नवसाचं पोरगं म्हणत शाळेत तक्रार करायला येणारे पालक देखील आता आभाळातुन पडलेलं पोरगं समजुन मुलावर येणारे आजाराचे संकट या परिणामांचा विचार न करता बिनधास्त पणे मुलांना शिकवणीसाठी पाठवत आहे.

तर दुसऱ्या बाजुला रोज चे येणारे नविन- नविन परिपत्रके, सुचना, विद्याथ्यांचे बँक अकाऊंट ओपन करणे, स्वाध्याय सोडवणे, सेतु प्रश्न पत्रीका सोडवणे इत्यादी कामकाज तपासणीच्या नावाखाली शिक्षण विभागाचे अधिकारी पाकीटे घेऊन मजा मारत आहे शेवटी जो करतो तोच मरतो असे म्हणण्याची वेळ आली आहे

 पुढील पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे कोणी लिहीले माहीत नाही परंतु हे खुले पत्र वाचण्या सारखे आहे म्हणुन ध्येय न्युज हे प्रसारीत करीत आहे

एका शिक्षकाचे समाजास खुले पत्र..

शिक्षक जेंव्हा शाळेत असताना जीव तोडून शिकवत होते,तेंव्हा तू बावळ्यासारखा शाळेतून पळून जात होतास.आणि आता शिक्षकी पेशावर भरभरून बोलताना तू पातळी सोडतोस?…
कधी पालक म्हणुन शाळेत आलास तर माझ्या पोरावर लक्ष ठेवा म्हणतोस…….”सर,मी नाही शिकलो पण निदान पोराला तरी मी शिकवणार.”असे अपेक्षेने म्हणतोस!!
शाळेत शिक्षकाला भांडताना पोरासमोर अद्वातद्वा बोलतो आणि मग तेच पोरगं लाडावून वाया जातं,तेंव्हा शिक्षकाची आठवण काढतोस…!!
पण मित्रा,एखाद्या लग्नात पाहुण्यांच्या सत्कारासाठी शिक्षकाच्याच हातात माईक सोपवतोस…!!
निवडणुकीत फुशारक्या मारत राडा करतोस पण मशिनची बटणं दाबताना मात्र गोंधळून जातोस…!!
पोरांवर संस्कार चांगले होतील म्हणुन शिक्षक कॉलनीत रहायला उत्सुक असतोस,पण चार माणसात शिक्षकाचा पगार काढतोस…!!
शिक्षकासारखा चिकट कुणीच नाही म्हणतोस,पण लेकीसाठी जावई हटकून शिक्षकच शोधतोस…!!
वर्षभर पोरासमोर करु नाही ते करतोस,आणि मग बोर्डाच्या परीक्षेत खिडकीतून उडी मारुन पोराला कॉप्या पुरवतोस…!!
* अरे लॉकडाऊनमध्ये एक पोरगं सांभाळताना नाकी नऊ आले म्हणतोस,आणि भरगच्च वर्गात
शिकवणा-या शिक्षकाला मास्तरडा म्हणतोस…!!*
शिक्षकाला टोचून बोलताना,डबल इंजिन आहे म्हणतोस; पण इंजिनाच्या मागे निघणाऱ्या धुराकडे सोयिस्कर दुर्लक्ष करतोस…!!
अरे मुलांच्या को-या पाटीवर आम्ही ओव्या लिहतोय तर तू त्याच्यासमोर शिव्या का देतोयस…!!
शिक्षक आहे उद्याच्या भारताचा मैलाचा दगड, म्हणुनच एखाद्या शिक्षकाने नमस्कार केला तर त्याला कमी समजू नकोस…!!

कोरोनात रोडवर चेक पोष्ट , दारु दुकानावर आणि विलगीकरणाची ड्युटी सुध्दा केली.

स्वतःचे आरोग्य धोक्यात घालुन घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली.

विद्यार्थ्यांचे आधार लिंक केले.

गत वर्षी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.

या कोरोनाच्या काळात ऑन लाईन क्लास सुद्धा घेत आहे .

शालेय पोषण आहार वाटून कार्यालयीन कामे केली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य केले.

निवडणूकीच्या वेळी बी.एल.ओ. ची कामं केली.
कित्येक शिक्षकांचे कोविड मध्ये बळी सुद्धा गेले.

कोविड निधीसाठी वेतन देऊन संवेदनशीलता दाखवली.

मित्रा,माफ कर पण हे बघ आम्हाला तुझा राग धरुन चालणार नाही,कारण आम्हांला तुझ्या पाल्याला उच्चविद्याविभुषीत झालेलं पहायचय,शिक्षकांना या पेक्षा आणखी काय हवं असतं?……..



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here